31 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरसंपादकीयपवारांना सुटेना ‘४०० पार...’ चे गणित

पवारांना सुटेना ‘४०० पार…’ चे गणित

लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी असेल हा विषय त्यांनी साळसूदपणे बाजूला ठेवला.

Google News Follow

Related

देशाचे चित्र सध्या भाजपाला अनुकूल नाही, असे मत शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. कारणमीमांसा देताना ते सांगतात की, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, पंजाबमध्ये भाजपा नाही. काही ठिकाणी भाजपा आहे पण स्वत:च्या ताकदीवर नाही. त्यामुळे भाजपा जरी ४०० पार म्हणत असली तरी ते खरे नाही. पवारांचे मत म्हणजे निव्वळ हातचलाखी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीत दोन दिवसांचे शिबीर होते. त्या शिबीराच्या समारोपाच्या सत्रात पवारांनी कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले. २०२४ मध्ये पक्षाचे दुकान बंद होणार हे पवार सांगतील तरी कोणत्या तोंडाने. स्वत:च्या पक्षाबाबत बोलण्याची सोय नाही. उरलेला पक्ष कधी संपेल हेही सांगता येणार नाही, अशा परीस्थितीत लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष काय कामगिरी करेल हे सांगणे सोयीचे नसते. पवार अशा वेळी ते बेमालूमपणे थापा मारतात. लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी असेल हा विषय त्यांनी साळसूदपणे बाजूला ठेवला. यापूर्वीही त्यांनी असे बात चलाखीचे प्रयोग अनेकदा केलेले आहेत.

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्लीत सत्ता नसताना २०१४ मध्ये भाजपाची सत्ता आली होती, याचा पवारांना विसर पडलेला दिसतो. पंजाबमध्ये अकाली दल सत्तेवर होते. भाजपाची त्यात मूठभर हिस्सेदारी होती. झारखंडमध्ये रघुवर दास २०१४ ते २०१९ या काळात होते. कर्नाटकात काही काळ सत्ता होती. बाकी राज्यात २०१९ पूर्वीही भाजपाची सत्ता नव्हती. तरीही मोदी पुन्हा पंतप्रधान झाले.

आजही परीस्थिती बदललेली नाही. प.बंगालमध्ये आधी डाव्यांचा दबदबा होता, आज तृणमूल काँग्रेसचा आहे. केरळमध्ये डावे आणि काँग्रेसमध्ये खो-खो सुरू असतो. तामिळनाडू, आंध्र, तेलंगणात प्रादेशिक पक्षांचा दबदबा असतो.
त्यामुळे पवारांचे विश्लेषण निव्वळ तकलादू आहे. जानेवारी २०२३ मध्ये सी-व्होटरचा सर्व्हे आला होता. यात मविआला ३४ तर महायुतीला १४ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी पवार म्हणाले होते की भाजपाच्या जागा देशभरात घटताना दिसत आहेत.

डिसेंबर महिना उजाडला. पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला तीन राज्यात दणदणीत यश मिळाले. तेव्हा पवारांनी पलटी मारत ट्रेण्ड भाजपाच्या बाजूने आहे, हे स्वीकारलेच पाहिजे, असे विधान केले. पूर्वीच्या विधानाचा बहुधा त्यांना विसर पडला. आज देशातील सर्वाधिक राज्यात भाजपाची सत्ता आहे. जिथे सत्ता नसते अशा राज्यातही लोकसभा निवडणुकीत लोक भाजपाला पसंती देतात, असा अनुभव आहे.

हे ही वाचा:

दाऊदच्या स्थावर मालमत्तेची खरेदी केली दिल्लीच्या अभय श्रीवास्तव यांनी

भव्य राम मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट

जय श्रीराम : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पोटी येऊदे ‘राम’

उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर २०० तोफगोळे डागले

 

कर्नाटक, राजस्थान, दिल्लीत काँग्रेसची सत्ता असतानाही लोकसभा निवडणुकीत जनतेची पसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राहीलेली आहे. मोदींची गॅरेण्टी काही खरी नाही, असा दावा पवार करतायत. परंतु देशाची हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, याचा पवारांना अंदाज नाही. बारामती लोकसभा मतदार संघात यंदा काय घडेल याचाही अंदाज बहुधा त्यांना नसावा.

पवारांना ठाऊक नसलेली गोष्ट २०२४ मध्ये घडणार आहे. भाजपाच्या आजवरच्या कारकीर्दीत न घडलेला चमत्कार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत घडणार आहे. कर्नाटकने भाजपाचे सरकार पाहिले आहे, तिथे भाजपाला लोकसभा निवडणुकीत मिळालेले घसघशीत यशही पाहिले आहे. परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपाचे पहिल्यांदा खाते उघडले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तामिळनाडूमध्ये भाजपाचा जबरदस्त अंडर करंट आहे. राज्यात आलटून पालटून राज्य करणाऱ्या द्रविडी पक्षांना झटका बसेल असा निकाल यावेळी तामिळनाडूमध्ये लागणार आहे. विधानसभेतही तेच चित्र असेल. तेलंगणात भाजपाची दमदार कामगिरी करणार आहे. केरळमध्येही भाजपाने खाते उघडले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

अब की बार ४०० पार ही घोषणा देणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना दक्षिणेतील चमत्काराची चाहूल लागलेली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगढ, राजस्थान, महाराष्ट्र, या राज्यांसोबत दक्षिणेतील राज्यही भाजपाच्या मिशन ४०० पार मध्ये यावेळी घसघशीत हातभार लावणार आहेत. भाजपाकडे रोडमॅप तयार आहे.

भाजपा देशात गोबेल्स नीती राबवते, असा आरोप करताना पवारांनी स्वत:च गोबेल्स नीतीची झलक दाखवली आहे. २०२४ मध्ये लोकांचे मतदान कामाच्या आधारावरच होणार आहे. लोक देशासाठी मतदान करतील. त्यामुळे या निवडणूक वर्षानंतर शरद पवारांचा पक्ष भिंग घेऊन शोधावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा