23 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरसंपादकीयएंटेलिया खाली पुन्हा स्फोटके...

एंटेलिया खाली पुन्हा स्फोटके…

Google News Follow

Related

पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात गरळ ओकली आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या भूमीची निवड केली आहे. पाकिस्तान हा मातीने भरलेला जुना ट्रक आणि भारत हा मर्सिडीज अशी तुलना त्यांनी केली आहे. कितीही चकचकीत असली तरी ट्रकसमोर मर्सिडीज टीकत नाही, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ही तुलनाच मुळात चुकलेली आहे. पाकिस्तानचे नेते अजून जमीनीवरच असल्यामुळे असेल भारताची स्टारशिप अंतरीक्षात पोहोचली हे त्यांच्या लक्षातच येत नाही.  पाकिस्तानच्या जुन्या ट्रकला लेसर बीमच्या सहाय्याने क्षणात उद्ध्वस्त करण्याची भारताची ताकद आहे. त्यांनी आतापर्यंत फक्त ब्रह्मोसची चव चाखली आहे. ते तर फक्त ट्रेलर होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या या मुनीरला कडेवर घेतले आहे. तालेवारांनी ट्रम्प यांच्यापासून काडीमोड घेतलेला आहे. त्यामुळे हल्ली त्यांच्याकडे मुनीर यांच्यासारखे भिकमागे उरलेले आहेत. भारत रशियाचा हात सोडायला तयार नाही, चीन भारताचा हात घट्ट पकडण्यासाठी उत्सुक आहे, म्हणून ट्रम्प भारताला दाखवण्याचा प्रय़त्न करीत आहेत, तुमच्याकडे पुनीत, जिनपिंग असतील तर आमच्याकडे मुनीर नावाचा बुलडॉग आहे.

फ्लोरीडाच्या टेम्पामध्ये पाकिस्तानी वंशाच्या लोकांसमोर मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात बडबड केली आहे. बोल वो रहे है, शब्द हमारे है असा मामला इथेही आहे. मुनीर अमेरिकेची म्हणजेच ट्रम्प यांची स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत. मुकेश अंबानी यांची जामनगरची रिफायनरी, सिंधू नदीवरील प्रस्तावित धरणाला लक्ष्य करू, आम्ही संकटात आलो तर अर्ध्या जगाला घेऊन बुडू. अशी बरीच बडबड केलेली आहे. भारताने या प्रकरणी थेट अमेरिकेवर बोट ठेवले आहे. मित्र देशाच्या भूमिवरून मुनीर यांनी केलेले वक्तव्य सर्वथा अनुचित असल्याचे भारताने म्हटलेले आहे.

हे ही वाचा:

टॅरिफ वादात कंबरडे मोडणार अमेरिकेचेच!

डायबिटीजसारख्या तक्रारीत कशामुळे मिळतो दिलासा ?

एनपीएस वात्सल्य योजना अंतर्गत किती ग्राहकांची नोंदणी ?

बलुच दहशतवादी नाहीत, तर पाक प्रायोजित दहशतवादाचे बळी

अमेरिका भारताला पाकिस्तानचे भय दाखवत आहे. ७ मे ते १० मे या काळात पाकिस्तानची केलेली कुटाई पाकिस्तान विसरला हे ठिक, परंतु अमेरिकाही नूरखान हवाईतळावर भारताने साजरी केलेली दिवाळी विसरला की काय ? पाकिस्तानने कुरापत काढली की यावेळी कराचीही वाचणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल प्रमुखांना सांगूनच ठेवले आहे, की त्यांनाही कराचीत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळेल. भारताने एकदा भाजून काढायला सुरूवात केली की पाकिस्तानला कोण वाचवणार?  पाकिस्तानचे तेच होईल जे आज युक्रेनचे होताना दिसत आहे. अमेरिका पाठिशी असूनही रशिया युक्रेनला तिंबून काढतोय. ट्रम्प फक्त इशारे देतायत. आता तर ते युक्रेनच्या विभाजनाच्या गोष्टी बोलतायत. उद्या पाकिस्तानच्या वाट्यालाही हेच येणार आहे.

मुनीर यांनी अंबानी यांना का लक्ष्य केले हे जाणून घेणे महत्वाचे. एके काळी भारतातील सर्वसामान्य नागरीकांना भयभीत कऱण्याचा प्रय़त्न करायचा. आता उद्योग जगतात दहशतनिर्माण करण्याचे पाकिस्तानने सुरू केले आहेत. कारण भारताच्या लष्कराला मिळालेले बळ हे भारताच्या आर्थिक ताकदीमुळे लाभले आहे, हे पाकिस्तानच्या लक्षात आलेले आहे. मविआच्या सत्ताकाळात अंबानी यांच्या एंटालिया खाली स्फोटके ठेवून त्यांना घाबरवण्याचा प्रय़त्न काही लोकांना केला होता. त्यातले फक्त प्यादे पकडले गेले आहेत, खरे सूत्रधार अजून कायद्याच्या कचाट्यात आलेले नाहीत. देशातील सगळ्यात मोठ्या उदयोगपतीकडून मोठी खंडणी वसूलण्याचा डाव होता. परंतु ज्यांनी हा बनाव रचला त्यांची काय परीस्थिती आहे, हे मुनीर यांनी लक्षात घेतले पाहीजे. काही तुरुंगात काही अडगळीत अशी त्यांची परीस्थिती आहे. मुनीर यांचे वर्णन पेंटॅगॉनचा माजी अधिकारी मायकेल रुबीन याने गणवेशातील ओसामा बिन लादेन असे केले आहे. भारतात तो मुल्ला मुनीर म्हणून कुप्रसिद्ध झालाच आहे. याच्या विरोधात भारताने तेच केले पाहीजे जे इस्त्रायलने इराणच्या रेव्हॉल्यूशनरी गार्ड्स कॉर्पचा प्रमुख हुसैन सलामी याला ठार केले तसेच भारताने या मुनीरला ठोकण्याची गरज आहे. अगदी बंकरमध्ये लपून बसला तरी.

अमेरिकेला भारताची प्रगती खूपते आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कालच हे एका भाषणात स्पष्ट केले. फक्त मुनीर यांना माहित नाही, अंबानी ट्रम्प यांच्या तोंडावर असा काही तुकडा फेकतील की ट्रम्प त्यांची प्रशंसा करू लागतील. ट्रम्प यांच्या कतार भेटीत आमीर तमिन बिन हमाद अल थानी आयोजित केलेल्या शाही भोजनाला अंबानी सपत्नीक उपस्थित होते. त्यांनी ट्रम्प ऑर्गनायझेशनला १० दशलक्ष डॉलर देऊन मुकेश अंबानी यांन त्यांच्याशी डील केले होते. अलिकडे एपलचे सीईओ टीम कुक यांनी ट्रम्प यांनी अलिकडेच २४ कॅरेट सोन्याचे गिफ्ट दिले होते. कतारने विमान भेट दिले होते. अंबानी असं बरंच काही देऊ शकतात. अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात ट्रम्प यांची कन्या सहभागी झाली होती. हे बहुधा मुनीर यांना माहित नाही.

आता राहीला मुद्दा ट्रक आणि मर्सिडीजचा. मुनीर यांना गेल्या ११ वर्षात भारत कुठे पोहोचला आहे, याची जाणीवच नाही. भारताच्या समोर उभे राहण्याचीही पाकिस्तानची क्षमता नाही आणि लायकीही नाही. भारत आज ते करतोय जे करण्याची क्षमता जगातील तीन पेक्षा अधिक देशांकडे नाही. भारतात आजचे स्टार्टअप आहेत, ते स्पेसेक्सशी स्पर्धा कऱण्याची क्षमता ठेवतायत. २०२४ च्या मे महिन्यात भारतातील एका स्टार्टअपने केलेला चमत्कार बहुधा मुनीर यांना माहिती नाही, अन्यथा त्यांना आपली लायकी विसरून विधाने केली नसती.  चेन्नईतील अग्निकुल कॉसमॉस या भारतीय स्पेस स्टार्टअप कंपनीने आपल्या ‘अग्निबाण’ रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाने भारतीय अंतराळ क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला.

अग्निकुल कॉसमॉसची स्थापना २०१७ मध्ये श्रीनाथ रविचंद्रन, मोईन एस. पी. एम. आणि आयआयटी मद्रासचे प्राध्यापक एस. आर. चक्रवर्ती यांनी केली होती. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतींनीही या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. सात वर्षात हे भव्य यश मिळवण्यात या कंपनीला यश आले. श्रीहरिकोटा येथील स्वतःच्या धनुष या खासगी लॉन्चपॅडवरून ‘अग्निबाण (सब-ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर) रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले.  अग्निकुल ही भारताची दुसरी खासगी कंपनी ठरली, जिने स्वतःचे रॉकेट अवकाशात पाठवले. यापूर्वी, स्कायरूट एरोस्पेसने २०२२ मध्ये हे यश मिळवले होते.

अग्निबाण’ रॉकेटचे ‘अग्निलेट’ इंजिन. हे जगातील पहिले असे इंजिन आहे जे एकाच धातूच्या तुकड्यामध्ये  थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बनवले आहे. यामुळे रॉकेटच्या निर्मितीचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. हे रॉकेट सेमी-क्रायोजेनिक इंजिनवर आधारित आहे, जे वायू आणि द्रवरूप इंधन दोन्हीचा वापर करते. हे तंत्रज्ञान अद्याप इस्रोने देखील त्यांच्या कोणत्याही रॉकेटमध्ये वापरलेले नाही, ज्यामुळे अग्निकुलच्या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  ही पूर्णपणे स्वदेशी निर्मिती आहे. रॉकेटमधील डेटा ॲक्विझिशन सिस्टिम आणि फ्लाइट कॉम्प्युटर्ससह १००% घटक कंपनीने स्वतःच विकसित केले आहेत.  हे रॉकेट १०० किलो वजनापर्यंतचे उपग्रह ७०० किलोमीटर उंचीवरील कक्षेत ठेवण्यास सक्षम आहे.

तेव्हा मुनीर यांनी हे लक्षात घ्यावे, हीच रॉकेट सामरीक वापरासाठीही तितकीच उपयुक्त आहेत. त्यामुळे धुळीने भरलेला ट्रक आकाशात बसलेल्या स्पेसशिपचा सामना करू शकत नाही, हे मुनीर याने लक्षात घेण्याची गरज आहे. ट्रम्प यांच्या नादाला लागून रशियाशी भिडलेल्या युक्रेनचे काय हाल झाले हे एकदा पुन्हा पाहून घेतले तर असी बकबक करण्याचे धाडस मुनीर यांना होणार नाही.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा