मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लक्षात आले की, आपली सत्ता गेली, त्यामुळे देशाची लोकशाही आता धोक्यात आलेली आहे. तेव्हापासून ते देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सक्रीय झालेत. लोकसभा निवडणुकी आधी देशातील लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना पश्चिमी देशांची आवश्यकता भासली म्हणून ते ब्रिटन आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊन आले. तिथे त्यांनी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या एनजीओंशी संबधित बऱ्याच गाठीभेटी घेतल्या. सध्या ते दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. कोलंबिया, चिली, पेरू आणि ब्राझील या देशांमध्ये ते भेट देणारे आहेत. बहुधा तिथेही ते देशातील लोकशाही वाचवण्याचे आवाहन कऱण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते राहुल गांध हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेते आहेत. जगभरातून त्यांना बोलावणे येते. विविध विषयांवर त्यांची पकड इतकी आहे की, विविध विद्यापीठांमध्ये ते भाषण ठोकायलाही जातात. याच लोकप्रियतेमुळे त्यांना दक्षिण अमेरिकेतही बोलावणे आले आहे. ते कोणी पाठवले आहे, याबाबत मात्र कोणताहीही तपशील काँग्रेस पक्षाने उपलब्ध करून दिलेला नाही.
कोलंबिया हा राहुल गांधी यांचा पहिला थांबा. त्यांनी दौऱ्याची सुरूवात इथूनच गेली. जगभरात हा देश ड्रग्ज कार्टेलसाठी ओळखला जातो. इथले राजकारणही ड्रग्ज माफीयाच नियंत्रित करतात. चालू वर्षी या देशात निवडणुका असताना डेमोक्रॅटीक सेंटर या उजव्या विचारसरणीच्या पक्षाचा नेता, अवघ्या ३९ वर्षांचा तरुणमिगेल उरीबे तुर्बे अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत होता. तो लोकप्रियही होता. ७ जून रोजी बोगोटा शहरात त्यांची सभा सुरू असताना पाठीमागून ९ एमएमच्या ग्लॉंक पिस्तूलाने त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी दोन त्यांच्या डोक्यात शिरल्या, एक छातीत दोन महिने हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्या अंगरक्षकाने हत्या करणाऱ्या १५ वर्षाच्या युवकाला पकडले होते. ‘आपल्याला स्थानिक ड्रग्ज माफीयाने सुपारी दिली होती’, असा कबुली जबाब त्याने पोलिसांना दिला. अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवारांची हत्या कोलंबियामध्ये काही आश्चर्याची बाब नाही. १९८० ते १९९० या काळात इथे सतत या घटना घडत होत्या. कदाचित लोकशाही वाचवण्याची ही कोलंबियन पद्धत असावी. राहुल गांधी त्या देशात दाखल झालेले आहेत.
चार देशांमध्ये राहुल गांधी दौरा करणार आहेत. ते चारही देश ड्रग्ज कार्टेलसाठी प्रसिद्ध आहेत. कोकाचे उत्पादन होते. ज्यापासून कोकेनची निर्मिती केली जाते. हे उद्योग या चारही देशांमध्ये चालतात तिथून ड्रग्जची अमेरिकेला आणि जगभरात तस्करी केली जाते. अमेरिकेने कोलंबियातील ड्रग्ज माफीयांवर अनेकदा हवाई हल्ले केले आहेत. हे चारही देश राजकीय अस्थिरता आणि अनागोंदीसाठी प्रसिद्ध आहेत.
राहुल गांधी या देशांमध्ये दाखल झालेले आहेत. तिथे ते विद्यार्थी, उद्योजक, राजकीय नेते आणि अर्थातच एनजीओशी संबंधित लोकांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या या दौऱ्याचे टायमिंग लक्षात घ्या. बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू आहे. त्यांनी बिहारमध्ये वोट सुरक्षा रॅली काढली होती. ती संपल्यानंतर ते मलेशियाला रवाना झाले. भारतात परतले आणि आता ते दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
हेही वाचा..
मौलाना तौकीर रझाच्या निकटवर्तीयांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोझर कारवाई?
पंतप्रधान मोदी संघ शताब्दी समारंभात होणार सहभागी!
रायपूरमध्ये ‘लव्ह जिहाद’ थीमवर आधारित गरबा!
“मुजाहिदीन आर्मी” स्थापन करण्याचा कट रचणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक!
देशाची लोकशाही वाचवण्यासाठी अविवाहीत राहिलेल्या राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाचे नेते विनाकारण बोंब ठोकत असतात. भाजपाचे समर्थक विनाकारण असा अप्रचार करत असतात की, राहुल गांधी यांचा वेरॉनिका या त्यांच्या स्पॅनिश मैत्रीणीशी विवाह झालेला आहे. त्यांना मुलंही आहेत. हे असे असते तर राहुल गांधी यांनी कधीच कबुल केले असते. त्यांना अभिमानही वाटला असताना कि त्यांचे पिताश्री राजीव गांधी यांनी जी परंपरा सुरू केली त्याचे त्यांनी पालन केले आहे. वेरॉनिका जर सौ. राहुल गांधी असत्या तर भारतात येऊन भारतात नागरिक होण्यापूर्वी त्या येथे मतदार झाल्या असत्या. सोनिया गांधी यांच्याप्रमाणे कदाचित भारताच्या सुपर प्रायमिनिस्टर झाल्या असल्या. त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले असते.
राहुल गांधी परदेशात गेले की, भाजपा नेत्यांच्या पोटात विनाकारण गोळा येतो. जे भारताच्या विरोधात षडयंत्र करतात. त्यांना भारताच्या विरोधात उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या मदतीने एक आघाडी निर्माण करायची आहे. या दौऱ्या दरम्यान ते यावेळी कुणासोबत बंद दाराआड बैठका घेणार आहेत? असा सवाल भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी उपस्थित केलेला आहे. भाजपाचा पोटशूळ स्पष्टपणे दिसतो आहे.
राहुल गांधी यांची त्यांचे विदेश दौरे जारी ठेवावेत, विदेशातील कनेक्शन मजबूत करावी. देशात निवडणुकीच्या माध्यमातून ते सत्तेपर्यंत जातील अशी शक्यता नाही. त्यामुळे विदेशी मदतीनेच त्यांना देशातील लोकशाही मजबूत करावी लागणार आहे. दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांच्या सर्वच उघड किंवा छुप्या गाठीभेटींना, त्यांच्या संविधान वाचवण्याच्या मोहिमेला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







