25 C
Mumbai
Thursday, January 1, 2026
घरसंपादकीयशाहरुखने पुन्हा शेण खाल्ले...

शाहरुखने पुन्हा शेण खाल्ले…

Google News Follow

Related

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अनन्वित अत्याचारामुळे देशात संतापाचे वातावरण आहे. उर्दूवुडला मात्र यामुळे काही फरक पडताना दिसत नाही. शाहरुख खानने हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. तिथे हिंदूंना जाळले जात आहे, त्यांना गोळ्या घातल्या जात आहेत, अशा काळात शाहरुख आयपीएलसाठी बांगलादेशच्या मुस्ताफीजूर रेहमान या खेळाडूला उरावर घेतो आहे. कोलकाता नाईट रायडरसाठी ९.२० कोटी रुपये देऊन करारबद्दध केले आहे. त्याचा जीव फक्त इस्लामी भाईबंदांसाठी कळवळतो, त्याच्या हिंदूंच्या वेदनांशी त्याला काही देणेघेणे नाही, हे शाहरुखने पुन्हा दाखवून दिले आहे.

बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात फक्त बांगलादेशची जनता नाही, तर तिथला हंगामी सत्ताधीश मोहमद यूनस हाच मुख्य भारत विरोधी आहे. त्याने तर एका मुलाखतीत असे स्पष्ट म्हटले आहे, बांगलादेशातील हिंदूंनी स्वत:ला हिंदू म्हणवून घेणे बंद केले पाहीजे. हिंदूंबाबतचा द्वेष यांच्या रक्तात आहे. तो सहजी जाणे शक्य नाही. यूनसच्या राजवटीत बांगलादेशात हिंदू अधिक असुरक्षित झाला आहे. दिपू चंद्र दासला जिवंत जाळल्यानंतर बजेंद्र विस्वास या तरुणाला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. किती हिंदूंची घरे जाळली गेली, किती महिलांवर-तरुणींवर बलात्कार झाले त्याची काही मोजदाजच नाही.

कोलकाता नाईट रायडरचा मालक म्हणून बांगलादेशचा फास्ट बोलर मुस्तिफीजूर रेहमान याला शाहरुखने ९ कोटी २० लाख रुपयांची बोली लावून करारबद्द केले. बांगलादेशात हिंदूंना जगण्याचा हक्क नाकाराला जातो आहे. तिथल्या खेळाडूंना भारतीयांच्या उरावर नाचवण्याचे काम स्वत:ला किंग खान म्हणवून घेणारा शाहरुख खान करतो आहे. शाहरुखच्या या निर्णयाच्या विरोधात अत्यंत जळजळीत प्रतिक्रीया येते आहे, उजैनच्या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदीराचे मुख्य पुजारी महावीर नाथ यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की, आम्ही रेहमानला भारतात खेळू देणार नाही. जिथे त्याचा सामना असेल त्या स्टेडीयमवर हल्लाबोल करून, तिथले मैदान खणून काढू. सोशल मीडियावर शाहरुखवर तुफानी टीका होते आहे. फक्त महावीर नाथ नाही, जर रेहमान भारताच्या भूमीवर खेळला तर अनेक महावीर पुढे येऊन केकेआरचा कार्यक्रम करतील हे नक्की. शाहरुख हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेत असेल तर हे झोपलेल्या सिंहाच्या नाकात काड्या करण्यासारखे आहे. अमेरिकेच्या एअर पोर्टवर याला विवस्त्र करून याची झाडाझडती घेण्यात आली होती. जगभरात हे असले प्रकार होतायत, त्यातून जो तिरस्कार निर्माण होतोय, त्याचे काही साळसुदांनी इस्लामोफोबिया असे नामकरण केले आहे. खाल्ल्या ताटात ओकाऱ्या काढणाऱ्या शाहरुखसारख्या लोकांचेच हे कर्त्तृत्व आहे.

हे ही वाचा:

कर्जाच्या वादातून घाटकोपरमध्ये महिलेचा गळा चिरला

दिशा चालवणार वडिलांचा वारसा

चांदीपासून कॉपरपर्यंत मोठी घसरण

लष्कराने साध्य केली आत्मनिर्भरता

पाकिस्तानचे खेळाडू भारताच्या विरोधात गरळ ओकत असले तरी त्यांना भारताच्या आय़पीएलमध्ये खेळायचे असते. बांगलादेशच्या खेळाडूंची मानसिकता वेगळी नाही. दोन्ही देश भिकारी आहेत. एक भिकेवर जगतो, एक कर्जावर. हाती कटोरा घेऊन देशभरता मदत किंवा भीक मागणे हा दोन्ही देशांतील नेत्यांचा महत्वाचा उपक्रम. परंतु भारताच्या विरोधात भूंकताना मात्र ही मंडळी शेर बनतात. इस्लामचे लढवय्ये बनतात. पुन्हा इथे खेळायलाही तयार असतात. त्यांच्या त्यांच्या देशातील मीडियासमोर बोलताना हे मोठे गाझी बनत असतात. वास्तवात हे पाजी असतात. रेहमानचेही असेच आहे. आय़पीएलमध्ये खेळण्यासाठी तो प्रचंड उत्सुक आहे. आता शाहरुखने कडेवर घेतल्यानंतर आपल्याला कोण रोखू शकते, असे त्याला वाटले असेल. भारतातून होणाऱ्या विरोधाचा आवाज त्याच्याही कानापर्यंत पोहोचला असावा. आपली आयपीएल खेळण्याची इच्छा आहे. परंतु मला जर खेळण्यापासून रोखले गेले तर भविष्यात आयपीएल खेळणार नाही, असे विधान त्याने केलेले आहे. याला म्हणतात भिकाऱ्याला ओकाऱ्या. चवलीपावलीचे हे खेळाडू स्वत:ला डेनीस लीली आणि मायकल होल्डींगपेक्षा पेक्षा कमी समजत नाहीत. रेहमान भारतात आला नाही तर आमच्या जीवनात काय फरक पडणार आहे. फरक त्याच्या जीवनात पडू शकेल. एवढी मोठी रक्कम आय़ुष्यात बहुधा त्याला पुन्हा पाहाता येणार नाही.

इस्लामी जगात कुठे खुट्ट झाले तर कळवळणाऱ्या बॉलिवूडच्या ताऱ्यांच्या जगात यामुळे काहीही फरक पडताना दिसत नाही. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनची फाशी रद्द करावी म्हणून सरकारला आवाहन करणाऱ्या प्रतिष्ठीतांच्या यादीत उर्दूवुडचे अनेक सितारे होते. त्यात शाहरुख खानचे नाव नव्हते. परंतु त्याची मानसिकता महेश भट आणि आमीर खानपेक्षा वेगळी नाही. भाजपाचे सरकार आले तर मी देश सोडून जाईन, असे मात्र त्याने छाती ठोकून सांगितले होते. सरकार आल्यानंतरही तो देशातच राहीला. खायचे इथे आणि गायचे पाकिस्तान-बांगलादेशचे हे त्यांचे धोरण आहे. त्यांना हिंदूंच्या खिशातून येणारा पैसा हवा आहे, तो खर्च मात्र करायचाय पाकिस्तान आणि बांगलादेशसाठी.

या मानसिकतेमुळे बॉलिवूडच्या विरोधात प्रेक्षकांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले होते. एक मूक आंदोलन छेडले होते, ज्या लाटेत आमीर, शाहरुख, सलमान याचे अनेक सिनेमे वाहून गेले. पठाण यशस्वी करण्यासाठी शाहरुखला पैसा ओतावा लागला. शाहरुखला भगवा रंग आवडत नाही, त्याच्या एका सिनेमात तसा डायलॉग आहे. म्हणून आम्हाला शाहरुख आवडत नाही.

या सुमार नटांचे चकचकीत आणि बनावट सिनेमे आजच्या कालबाह्य झालेले आहेत. आदित्य धरचा धुरंधर हा सिनेमा आल्यानंतर या खानावळीच्या सिनेमात किती बोगस माल भरलेला असतो, हे प्रेक्षकांना नव्याने उमगले आहे. सगळेच पाकिस्तानी वाईट नसतात, ही त्यांची फिलॉसॉफी आहे, पाकिस्तानी चांगले आहेत कि नाहीत याचा शोध घेण्याची आम्हाला गरज नाही ते भारतविरोधी असतात, हिंदूविरोधी असतात एवढे आमच्यासाठी पुरे आहे. शाहरुख म्हातारा झाला आहे, तो यापुढे चालणार नाही. त्यांची पाकिस्तानप्रेमी फिलॉसॉफीही हा देश यापुढे स्वीकारणार नाही. हिंदूंच्या पैशामुळे आपल्याला बरे दिवस आले, याचा विसर या मंडळींना पडत असतो, त्याची जाणीव त्यांना करून देण्याची गरज आहे. हिंदू जर पाकिस्तान आणि बांगलादेशात सुरक्षित राहणार नसेल तर भारत पाकिस्तान आणि बांगलादेश प्रेमींना यापुढे चांगले दिवस राहणार नाहीत, याची काळजी देशभरातला हिंदू घेईलच.

ब़ॉलिवूड म्हणजे उर्दूवूड अर्थात गँग्स ऑफ पाकिस्तानच्या विरोधात आता आवाज उठू लागले आहेत. जान्हवी कपूरने इन्स्टाग्रामवर दिपू चंद्र दासच्या मृत्यूनंतर जी जळजळीत पोस्ट केली होती, ती पोस्ट शाहरुख सारख्यांच्या मौनावर होती. परंतु शाहरुखने त्याच्या पुढे जाऊन निलाजरेपणा केला आहे. बांगलादेशी खेळाडूला खांद्यावर घेतले आहे.

देशातील संतप्त जनता रेहमानचा विरोध करते आहे. त्याचा विरोध करून उपयोग काय? त्याचे मुके घेणाऱ्या शाहरुखचा विरोध व्हायला पाहीजे. त्याच्या घराच्या समोर निदर्शने झाली पाहीजेत. त्याचे तोंड काळे केले पाहीजे. त्याच्या सिनेमावर, त्याच्या कंपूवर बहिष्कार घातला पाहीजे, त्याला हिंदूविरोधाचा धडा शिकवला पाहीजे.

उर्दूवुडच्या कलाकारांना पाकिस्तानचे येणारे उमाळे जुने आहेत. दिलीप कुमारपासूनचा इतिहास आहे. तो इतिहास शाहरुख जपतो आहे. दिलीप कुमार यांच्या काळात हे पाकिस्तान प्रेम खपून गेले. आजच्या भारतात हे शक्य होणार नाही. हिंदूंचा पैसा आणि प्रेम यामुळे जे मोठे झाले त्यांनी हिंदूंशी गद्दारी केली तर त्यांचे काय होते, याची उदाहरणे राजकारणात बरीच आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणातही आहेत. बॉलिवूडमध्येही या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. त्याची सुरूवात शाहरुखपासून होऊ शकते. लालसिंह चड्ढा आपटल्यानंतर आमीर खानचे डोके ठिकाणावर आले. मुलीचे लग्न त्याचे एका हिंदू तरुणाशी लावले ते हिंदू पद्धतीने झाले. शाहरुखच्या तर अनेक सिनेमांचा लालसिंह चड्ढा झालेला आहे. त्याच्या डोक्यातही प्रकाश पडेल याची काळजी हिंदू समाज घेईलच.

दिपू चंद्र दास, बजेंद्र विस्वासच्या हत्येबाबत, बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत हिंदूच्या मनात प्रचंड संताप आहे. हा संताप व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे जे जे हिंदूविरोधी आहे, त्यांच्यावर बहिष्कार, त्यांच्या इको सिस्टीमचा बहिष्कार.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा