24.6 C
Mumbai
Wednesday, January 21, 2026
घरसंपादकीयदोन मठ्ठ, दोन थपडा...

दोन मठ्ठ, दोन थपडा…

Google News Follow

Related

असं म्हणतात सत्य हे स्वयंप्रकाशित असते. ते कोणीही डागाळू शकत नाही. भारताचे लखलखीत यश डागाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन मुर्खांना सणसणीत थपडा पडल्या आहेत. त्यात भारताचे आईनस्टाईन राहुल गांधी आणि अमेरिकेचे ब़डबडराव डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. राहुल गांधी यांचा वोट चोरीचा दावाही जनतेने निकाली काढला आहे. खोट्याचा बाजार उठला आहे. याला म्हणतात सच्चे का बोलबोला, झूठे का मुह काला.

भारत ही डेड इकोनॉमी आहे, असा दावा आधी ट्रम्प यांनी केला होता. राहुल गांधी यांनी त्यांची पिंक लगेचच झेलली. तेही भारताला डेड इकोनॉमी म्हणाले. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आकडे जाहीर झाले आहेत. भारताने जीडीपीमध्ये ७.८ टक्के वाढ नोंदवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आपण एकवेळ समजू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा माज कुरवाळत नाहीत. भारत त्यांच्या म्हणण्यानुसार व्यापार करार करत नाही, म्हणून ते तोंडाळपणा करतायत. भारत ही डेड इकोनॉमी आहे, असा दावा करतात. आश्चर्य तेव्हा वाटते जेव्हा कोणतीही आकडेवारी नसताना राहुल गांधी लगेच हा दावा शिरमाथ्यावर घेतात. भारतात जन्म झाल्यामुळे भारताबाबत आस्था निर्माण होते असे नाही. राहुल गांधी केवळ जन्माने भारतीय आहे. देशाचा मान, प्रतिष्ठा, गौरव, संस्कृती याच्याशी राहुल गांधींचे काही देणे घेणे नाही. ते असते तर त्यांनी ब्रिटीश नागरिकत्व स्वीकारले नसते. सतत भारताच्या विरोधात बरळले नसते. ट्रम्प यांच्या मनात मोदी आणि भारताबाबत जेवढा विखार आहे, त्याच्या काकणभर जास्तच राहुल गांधी यांच्या मनात असेल. त्यामुळे त्यांनीही भारताची इकोमॉमी डेड असल्याचे जाहीर करून टाकले.

हेही वाचा..

‘मराठा आरक्षण’: फडणवीस म्हणाले, “दबावाखाली संविधानाच्या चौकटीबाहेर घेतलेले निर्णय टिकत नाहीत”

भारतात प्रचंड जीडीपी वाढीची क्षमता, स्पर्धकांपेक्षा आमचे प्रदर्शन चांगले

जवान हत्या प्रकरण : माओवादीांविरुद्ध आरोपपत्र दाखल

पुण्यात जे.पी. नड्डा यांनी घेतले श्रींचे दर्शन !

पहिल्या तिमाहीचे शानदार आकडे प्रस्तुत करून भारताने या दोघांचे तोंड काळे केले आहे. एप्रिल ते जून २०२५ या काळात भारताचा जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढला. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार अपेक्षित वाढ ६.५ टक्के होती. ही वाढ चौफेर आहे हे लक्षात घ्या. कृषी आणि कृषी उद्योग क्षेत्रात ही वाढ ३.७ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ही वाढ फक्त १.५ टक्के होती. उत्पादन क्षेत्रातील वाढ ७.७ टक्के, बांधकाम क्षेत्रात ७.६ टक्के. सेवा क्षेत्रात ९.३ टक्के वाढ नोंदवण्यात आलेली आहे. २७ ऑगस्ट रोजी भारतावर ५० टक्के टेरीफची आकारणी सुरू झाली आहे. त्यामुळे पर्यायी आयातदार देश शोधून ही आगेकूच सुरू ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर असेल. हे आकडे खणखणीत आहेत. हे आकडे डेड इकोनॉमीचे नाहीत. पहिल्या तिमाहीत ५० टक्के टेरीफ नव्हते हे सत्य असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांचा गडगडाट मात्र सुरू होता. वातावरण अनिश्चतेचे होते. तरीही भारताचे नेतृत्व आश्वस्त होते. जागतिक महासत्तेचा राष्टाध्यक्ष एकतर खोटारडा तरी आहे किंवा मूर्ख तरी आहे, हे स्पष्ट करण्याचे काम भारताच्या जीडीपीच्या आकड्यांनी केले आहे. राहुल गांधी यांची समज किती हेही पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

चुका मान्य करण्याचा मोठेपणा राहुल गांधी दाखवतील याची शक्यता शून्य. कारण, त्यामुळे मोदींचे नेतृत्व खणखणीत आहे हे स्वीकारवे लागेल. देश प्रगती करतो आहे, पुढे जातो आहे. जगात मंदीचे सावट असताना भारत चार पावले पुढे टाकतो आहे, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. खरे तर तो राहुल गांधी यांनाही असायला हवा होता आणि त्यांच्या पिलावळीला सुद्धा. ज्या घरात राहतो त्या घरातले सुख, दु:ख ओळखण्याची, त्यात समरस होण्याची क्षमता घरातल्या कुत्र्या, मांजरालाही असते. काँग्रेसच्या नेतृत्वात याचा अभाव दिसतो. देश प्रगती करतो आहे हे त्यांना सहन होत नाही. कारण ही प्रगती मोदींच्या कार्यकाळात घडते आहे. एकही काँग्रेसचा नेता तुम्हाला दिसणार नाही, ज्याने भारताने पहिल्या तिमाहीत नोंदवलेल्या कामगिरीचे कौतुक केले. हेच आकडे जर नकारात्मक असते तर यांचे चेहरे आनंदाने ओसंडत असते, कारण त्याचे खापर मोदींवर फोडता आले असते. ही माणंस आणि ही मनोवृत्ती म्हणजे देशाला लागलेली वाळवी आहे. देशाच्या यशापेक्षा यांच्या दृष्टीने दळभद्री राजकारणाचे महत्व जास्त असते.

एका बाजूला ही खणखणीत आकडेवारी आणि दुसऱ्या बाजूला बिहारी जनतेने राहुल गांधी यांच्या कुप्रचाराला चपराक लावलेली आहे. इंडीया टूडे समुह आणि सी व्होटरने मूड ऑफ नेशनचा ताजा सर्व्हे प्रसिद्ध केला. यात आजही निवडणूका झाल्या तर भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फक्त एवढेच नव्हे भाजपाच्या आणखी २० जागा वाढतील असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या सर्व्हेची विश्वासार्हता कमी झालेली असली तरी देशात हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, याचा साधारण अंदाज यातून येतो. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची ही तिसरी टर्म आहे. सतत एकाच पक्षाचे सरकार असले तर लोक कंटाळतात. परंतु, भाजपाची ज्या राज्यात सरकारे आहेत किंवा केंद्रातील सरकार याला हा नियम लागू होताना दिसत नाही. लोकांचे समर्थन या सरकारांना वाढत चालले आहे. त्याचे कारण स्पष्ट आहे. मोठ्या प्रमाणात विकासकार्य सुरू आहे. हा विकास समतोल आहे. सगळ्यात शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तिलाही याचा लाभ मिळताना दिसतो आहे. त्याचेही भले होते आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नकारात्मक राजकारण. देशात सर्वाधिक काळ सत्ता भोगलेला हा पक्ष. एका घरातून तीन पंतप्रधान आणि एक सुपर पंतप्रधान दिलेला हा पक्ष. परंतु, आपल्या सत्ता काळात देशासाठी काय केले हे सांगण्याचे या पक्षाचे नेते टाळतात. सांगायला गेले तर यांची गाडी आयआयची आणि आयआयएमच्या पलिकडे जात नाही. यूपीए सरकारच्या काळात तर मनरेगा या योजनेचे काँग्रेस नेते आपली यशस्वी योजना म्हणून मार्केटिंग करत होते. मोदींनी गेल्या ११ वर्षात एवढी मोठी रेष खेचलेली आहे की काँग्रेसचे तथाकथित कर्तृत्व कोणाला आठवतच नाही.

नैराश्याचे झटके आल्यासारखे राहुल गांधी दर दोन वर्षांनी एक नवा आरोप करतात. प्रत्येक नवा आरोप करताना जादूचा दिवा हाता आल्यासारखा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहात असतो. अज्ञानात सुख असतात असे म्हणतात. राहुल गांधी यांच्या वाट्याला हे सुख प्रचंड प्रमाणात आहे. कारण ते त्यांच्या अज्ञानाच्या तुलनेत आहे. वोट चोरी हा आपल्या हाती आलेला नवा जादूचा दिवा आहे असे त्यांना वाटते. त्यामुळे बिहारच्या निवडणुकांमध्ये वोट चोरीचा नावाचा हा कथित जादूचा दिवा घास घास घासतायत. बिहारी जनतेला याबाबत काय वाटते तेही मूड्स ऑफ नेशनच्या सर्व्हेत स्पष्ट झालेले आहे.
एकूण दोन लाख सहा हजार ८२६ लोकांच्या मतांचा विचार करून मूड ऑफ द नेशन अहवाल तयार करण्यात आला आहे. यात बऱ्याच मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला आहे. बिहारचे लोक मतदार याद्यांच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजनबाबत काय विचार करतात, हा त्यापैकी एक मुद्दा. देशातील ६४ टक्के लोकांना भारतातील निवडणुका ‘मुक्त आणि निष्पक्ष’ वाटतात. महाराष्ट्र आणि हरियाणा मधील ‘वोट चोरी’चा आरोप ५८ टक्के लोकांना तो खोटा वाटतो.

मतदार सूची सुधारणा (Special Intensive Revision – SIR) बाबत ५८ टक्के बिहारी जनता सकारात्मक आहे. ही प्रक्रिया नागरिकांचा मतदानातील सहभाग सुनिश्चित करण्यासाठी असल्याचे वाटते. बिहारमध्ये लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीएच्या मतांचा टक्का ४७ वरून ५० टक्क्यांवर जाईल. एनडीएच्या जागाही वाढतील आणि इंडी अलायन्सच्या जागा कमी होतील असे भाकीत करण्यात आले आहे. या अहवालानंतर राहुल गांधी या गोदी मीडियाचा अहवाल आहे, असे म्हणून त्यांचे आणि त्यांच्या चमच्यांचे समाधान करू शकतील. परंतु, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे हा तोच अहवाल आहे, ज्याने महाराष्ट्रातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे अचूक भाकीत केले होते. परंतु, हे लक्षात यायला एक विचारशील मेंदू हवा. अहंकार आणि माजाची जळमटे चढलेला मेंदू योग्य निष्कर्ष काढण्याची शक्यता शून्य आहे. म्हणजे राहुल गांधी यांच्या इतकीच.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा