23 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरसंपादकीयसी. ख्रिस्तीन फेअर ट्रम्प यांना चूxxx म्हणतात... मग राहुल गांधी कोण?

सी. ख्रिस्तीन फेअर ट्रम्प यांना चूxxx म्हणतात… मग राहुल गांधी कोण?

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकाकारांची आंतरराष्ट्रीय राजकारणात कमतरता नाही. मिकी माऊस ट्रम्प यांच्या पेक्षा जास्त समजदार असतो हे अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांचे विधान. परंतु तेही सौम्य वाटेल, असा शब्द आंतरराष्ट्रीय किर्तिच्या विश्लेषक, लेखिका आणि दक्षिण आशियाच्या अभ्यासक कॅरोल ख्रिस्तीन फेअर यांनी ट्रम्प यांच्यासाठी वापरला आहे. त्यांनी चक्क शिवी हासडली आहे. त्या ट्रम्प यांना चूxxx म्हणाल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, असे म्हटले तर ट्रम्प यांच्या प्रत्येक विधानांवर विश्वास ठेवणाऱ्या राहुल गांधी यांना काय म्हणावे?

पाकिस्तानी पत्रकार मोईज पीरजादा याने घेतलेल्या मुलाखतीत फेअर यांनी हे विधान केलेले आहे. त्यांचा प्रश्न भारताच्या संदर्भातच होता. जगातील अनेक विश्लेषकांना असे वाटते आहे की, भारत हा अमेरिकेसाठी महत्वाचा सामरीक भागीदार होता. परंतु टेरीफ टेरीफ खेळण्याच्या नादात ट्रम्प यांनी भारताशी असलेल्या संबंधांचे पोतेरे करून टाकले.

लक्षात घ्या कॅरोल फेअऱ या पाकिस्तानच्या अभ्यासक आहेत. भारतात बरीच लिबरल मंडळी ‘अमन की आशा’ नावाचे दुकान चालवायची, पाकिस्तानचा दहशतवाद ऐन भरात असताना तिथल्या लोकांसोबत संवाद आणि समन्वय हवा, असे ज्ञान वाटत फिरायची. त्या काळात या बाईंचे ‘फायटींग टू द एण्ड: पाकिस्तानी आर्मीज वे ऑफ वॉर’ हे पुस्तक प्रकाशित झाले. पाकिस्तानी लष्कराची मानसिकता उघड करणारे हे पुस्तक. पाकिस्तानी जनतेच्या मनात लहानपणापासून भारतद्वेष कसा पेरला जातो. याचे विश्लेषणही या पुस्तकात आहे.

त्यांना पाकिस्तान पुरेपुर माहीत आहे, तिथली भाषाही माहीती आहे. ‘ट्रम्प प्रशासनातील अनेक अधिकारी त्यांच्या क्षेत्रात फारसे तज्ञ नाहीत, असे त्या म्हणतात.

हे विधान अगदी योग्यच आहे. सत्तेवर आल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचा जावई, त्यांचे गोल्फ पार्टनर, त्यांची पुस्तके प्रकाशित करणारा प्रकाशक अशा सगळ्या जवळच्या लोकांची नियुक्ती अत्यंत महत्वाच्या पदावर केली. त्या पदाचा काडीचाही अनुभव त्यांच्याकडे नसला तरी चालेल ते ट्रम्प यांच्या प्रत्येक विधानाला मम म्हणणारे हवेत, एवढाच एक त्यांच्या नियुक्तीचा निकष. त्यामुळे सत्तेवर विराजमान झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात ट्रम्प यांनी सगळ्या जगाशी पंगा घेतलेला दिसतोय.

अमेरिका भारतावर ५० टक्के टेरीफ लादते आहे, जागतिक राजकारणात अमेरिकेचा कट्टर समर्थक असलेला युके भारतासोबत मुक्त व्यापार करार करतो, फ्रान्सच्या साफ्रॉन कंपनीने भारतासोबत १२० किलो न्यूटन च्या लढाऊ विमानांची इंजिने तयार करण्यासाठी करार केलेला आहे. जपानने भारतात येत्या दहा वर्षात १० ट्रीलियन येनची गुंतवणूक करण्याचे जाहीर केलेले आहे. जर्मनीचे भारतातील डेप्युटी ओन्वॉय डॉर्ज एन्झवेलर यांनी ट्रम्प यांचे टेरीफ धोरण मुक्त व्यापाराच्या मार्गातील अडथळा आहेत, असे विधान केले आहे. भारताचे समर्थन केले आहे. फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून चर्चा केली. ज्या देशांची मी चर्चा केली ते सगळे देश नाटोचे सदस्य देश आहेत. त्यांना सुद्धा ट्रम्प नीती मान्य नाही.

हे ही वाचा:

“गुजरातला पुरस्कार राजीव गांधी फाउंडेशनने दिला, राहुल गांधींनी आईला विचारावं”

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

राहुल गांधी यांच्या यात्रेत भाषा घसरतेय

“मोदी-ट्रम्प यांची चर्चा राहुल गांधींच्या समोर झाली होती का?”

कॅरोल फेअर ट्रम्प यांच्या ज्या अनअनुभवी अधिकाऱ्यांबाबत बोलतायत, त्यांच्याच सल्ल्यामुळे हे घडताना दिसते आहे.
चार वर्षे या चूxxx ला सहन करायचे आहे,” असे शिवराळ विधान कॅरोल यांनी केलेले आहे. पुढे सांगतात की “मला माहित आहे की मी चार वर्षांनंतर या देशात राहू शकत नाही,”
कॅरोल या काही राजकारणी नाहीत. तरीही त्या ट्रम्प यांच्या धोरणाचा कडाडून विरोध करतायत. कारण त्यांना ठाऊक आहे की ट्रम्प यांची धोरणे अमेरिकेच्या मुळावर येणारी आहेत.

ट्रम्प रोज त्यांच्या टीकाकारांना नवे मुद्दे देतायत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुक यांना त्यांच्या पदावरून हटवले. गेला बराच काळ अमेरिकेची सेण्ट्रल बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह आणि ट्रम्प यांच्यामध्ये राडा सुरू आहे. कुक यांची नियुक्ती २०२२ मध्ये झाली. नियमानुसार त्यांचा कार्यकाळ १४ वर्षांचा आहे. ट्रम्प यांनी पदावरून हटवल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. कुक यांना पदावरून हटवण्याचा कोणताही अधिकार ट्रम्प यांना नाही, असा दावा त्यांच्या वकीलाने केलेला आहे.

या सगळ्याचा अर्थ काय? विचार करण्यासाठी स्वत:च्या मेंदूचा वापर करणारी एकही व्यक्ति ट्रम्प यांना नको आहे. त्यांच्या सुरात सुर मिळवणारे हुजरेच त्यांना प्रिय आहेत. मोदी या श्रेणीत येत नाहीत. ब्लादमीर पुतील, शी जिनपिंग, ल्यूईज इनासिओ लुला दा सिल्व्हा हेही येत नाहीत. खरे तर ही यादी खूप मोठी आहे. पानभर फक्त नावेच लिहीत बसावे लागले.
याच ट्रम्प यांनी मोदी यांचा उल्लेख करत एक ताजी पोस्ट केली आहे. मोदी इज अ टेरीफीक मॅन, अशी जोरदार सुरूवात करत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धबंदीचे चऱ्हाट लावले. मोदी मोदींना फोन केला आणि पाच तासांत भारत-पाकिस्तानात युद्धबंदी घडवली असे विधान केले.

ट्रम्प यांच्या मुखातून अशी विधाने कधी बाहेर येतायत आणि आम्ही त्याचा वापर करतोय असे राहुल गांधी यांचे झाले आहे. कारण दोघेही बिनबुडाची आणि हास्यास्पद विधाने करण्यात प्रसिद्ध आहेत. सध्या राहुल गांधी बिहार निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांनी या विधानाचा पुरेपूर वापर केला. त्यांच्या वोट चोरीच्या प्रचाराला सरेंडर मोदी… या जुन्या प्रचाराचा तडका दिला.

राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांना एवढेही कळत नाही, की ट्रम्प सगळ्या जगाशी असे वागतायत. त्यांच्या समोर न झुकणाऱ्या नेत्याला धमकावणे, धमक्यांना भीक घातली नाही तर पाणउतारा करणे असा प्रकार सुरू आहे. मोदींचा पाणउतारा कऱण्याची त्यांची हिंमत नाही. म्हणून किमान काही तरी विधाने करून देशांतर्गत राजकारणातील देशबुडव्यांच्या हाती कोलीत देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

कधी काळी चीनसोबत रोमांस करणारे राहुल गांधी सध्या ट्रम्प यांना डोळा मारण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या प्रत्येक विधानावर टाळ्या वाजवतायत. कोणतेही विधान घेऊन राहुल गांधी यांनी इटालियन भांगडा सुरू केला की त्यांचे समर्थकही नाचायला लागतात. ट्रोलर तेच मुद्दे सोशल मीडियावर उगाळायला लागतात.

इथे मुद्दा हा येतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आरोपाबाबत संसदेत खुलासा केला आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे की, ‘युद्धबंदीसाठी आम्ही अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती केली नव्हती. नुरखान आणि शोरकोट हवाईतळावर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर आम्ही अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांच्याकडे आम्ही युद्धबंदीसाठी तयार असल्याचा निरोप दिला होता. युद्धबंदीसाठी मध्यस्तीची विनंती केली नव्हती.’

दार जे काही म्हणाले त्याचा अर्थ उघड आहे. ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत ज्या भाकड कथा सांगितल्या त्या सगळ्या तद्दन खोट्या आहेत. ट्रम्प यांनी मोदींना कधीही फोन केला नव्हता. दोन्ही नेत्यांचे कधीही बोलणे झाले नव्हते. ट्रम्प यांच्या विधानांवर ना भारतीय जनतेचा विश्वास ना जगाचा, परंतु राहुल गांधी यांचा मात्र त्यावर विश्वास आहे. ट्रम्प यांनी टाकलेली प्रत्येक पिंक झेलण्याची राहुल गांधी आणि त्यांच्या पिलावळीची तयारी आहे. त्यांचा काही गैरसमज असतात तर इशाक दार यांच्या विधानातून तो दूर झाला असता, परंतु त्यांना मोदींना बदनाम कराये आहे. त्यातून देशाचे नुकसान होत असेल तर त्यांना फरक पडत नाही. त्यांच्या प्रचाराला जनता गंभीरपणे घेत नाहीत, म्हणून राहुल गांधी पिसाळले आहेत. ते आता काहीही करायला सज्ज आहेत.

त्यामुळेच हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे की, कॅरोल फेअर ट्रम्प यांना चूxxx म्हणतात. ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना अनुभवहीन म्हणतात. जेफ्री सॅक्स म्हणतात की मिकी माऊस हा ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त स्मार्ट असतो. परंतु राहुल गांधी यांचा मात्र ट्रम्प यांच्या प्रत्येक विधानावर विश्वास ठेवतात. मग ट्रम्प जर कॅरोल यांच्या म्हणण्यानुसार चू…. आहेत, तर राहुल गांधी यांना काय म्हणावे?

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा