23 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरसंपादकीयमोदींनी ट्रम्पना खूष केले नाही तर? अमेरीकेने मादुरो यांच्यावर केला वोट चोरीचा...

मोदींनी ट्रम्पना खूष केले नाही तर? अमेरीकेने मादुरो यांच्यावर केला वोट चोरीचा आरोप

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहित आहे की मी नाखूष आहे, त्यांनी मला खूष करणे आवश्यक आहे. हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान आहे. भारतीय जनतेला या विधानाचा अर्थ कळतो आहे. भारत रशियाच्या तेलाची खरेदी बंद करण्याची शक्यता नाही, त्यामुळे ट्रम्प खूष होण्याचीही शक्यता नाही. जर ट्रम्प खूष झाले नाही, तर ते मोदींचा मादुरो करणार आहेत का? की शेख हसीना करणार? भारत व्हेनेझुएला नाही, नेपाळ नाही आणि बांगलादेशही नाही. परंतु मोदी जर ट्रम्प यांच्या तालावर नाचले नाहीत, तर येत्या काळात ट्रम्प जॉर्ज सोरोस नावाने भूत जिवंत करतील, भारतात येत्या काळात मोठ्या प्रमाणात दंगे-धोपे, आंदोलने सुरू होतील, ही बाब स्पष्ट आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेत अमेरिकेचे राजदूत मादुरो यांच्याविरोधात तिच भाषा बोलत होते जी राहुल गांधी मोदींच्या विरोधात वापरतायत. ते वैध मार्गाने सत्तेवर आले नव्हते हा माईक व्हाल्ट्झ यांचा मादुरो यांच्यावर केलेला आरोप नव्हता.
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांची उचलबांगडी केल्यानंतर आंतराराष्ट्रीय घडामोडींना वेग आला आहे. डेल्सी रॉड्रीग्ज यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. बाई अगदी निडर निघाल्या. ट्रम्प यांच्या ताटाखालचे मांजर होणे त्यांनी नाकारले, व्हेनेझुएला आपल्या साधन संपत्तीचे रक्षण करेल, देशाला आम्ही कोणाचीही वसाहत बनू देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ट्रम्प पिसाळले. ते म्हणाले डेल्सी रॉड्रीग्ज यांनी योग्य पावले उचलली नाहीत, तर त्यांची अवस्था आम्ही मादुरो यांच्या पेक्षा वाईट करू. योग्य पावले म्हणजे काय तेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी व्हेनेझुएलाच्या सगळ्या साधनांचा ताबा मागितला आहे.

हे ही वाचा:

एआय पोहचला घराघरात

केंद्र खत अनुदानावर ३७,९५२ कोटी करणार खर्च

डायबिटीज : घरी नक्की लावा ‘इन्सुलिन प्लांट’

उत्तर प्रदेशातील २.८९ कोटी मतदारांची नावे वगळली

कशाला, तर व्हेनेझुएलाला ग्रेट नेशन बनवण्यासाठी.
व्हेनेझुएलावर केलेले आक्रमण अखेरचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ग्रीन लॅंडही आमचाच असेही घोषित केले आहे.
ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. मी जे म्हणेन तेच योग्य असेल, ते मान्य केले नाहीत, तर तुम्हाला मी संपवणार. ट्रम्प जे काही करतायत ती अमेरिकेची मजबूरी आहे. अमेरिकेत काही उत्पादन होत नाही, शस्त्र, आयटी कंपन्यांच्या माध्यमातून जेवढा पैसा येतो तो देशाचे ३८ ट्रिलयन डॉलरचे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा नाही. ते जिथे जे मिळेल ते लुटणार आहेत. आपला निकृष्ट दर्जाचा माल चढ्या भावात विकणार आहेत. रशियाचे स्वस्त तेल घेऊ नका, आमचे महागडे तेलच तुम्हाला विकत घ्यावे लागेल, हा अमेरिकेचा आग्रह आहे. आमचे महागडे तेल विकत घेऊन मला खूष करावे लागेल, असे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगत आहेत.

ट्रम्प ही टुरटुर गेले वर्षभर करतायत. मोदी ऐकत नाहीत. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर ट्रम्प संकेत देतायत, तुमचा पण मादुरो होईल. ट्रम्प यांना नडणारे ब्राझिल, भारत, रशिया, चीन हे छोटे देश नाहीत. तिथे व्हेनेझुएला सारखी कारवाई शक्य नाही. मग ट्रम्प भारताच्या विरोधात काय करू शकतील.

हे ही वाचा:

एआय पोहचला घराघरात

आजचे संपूर्ण पंचांग | ७ जानेवारी २०२६ | शुभ-अशुभ मुहूर्त, तिथी, नक्षत्र

बिछान्यावर झोपल्यानंतरही झोप न येण्याची करणे काय?

रोज एका चमचा तीळ खाल्याने मिळते ताकद

एक तर ते मोदींची हत्या करण्याचा प्रयत्न करतील. हत्या हा अमेरिकी राजकारणाचा अविभाज्य हिस्सा राहीलेला आहे. मोदींच्या विरोधात असे प्रयत्न झाले आहेत का? अशा गोष्टी उघड होत नाहीत, मात्र पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री असताना मोदींच्या सुरक्षेत राज्य सरकारने भंयकर घोळ घातला होता. मोदींना एका विकास प्रकल्पाचे उद्घाटन करायचे होते. ते हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु अचानक हवामान बिघडल्यामुळे ते रस्ता मार्गाने निघाले. शेतकरी आंदोलनामुळे एका पूलावर १५ ते २० मिनिटे खोळंबला होता. ते उद्घाटन सोहळ्याला हजर न राहाता भटींडा येथे परतले. तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा की मी जिवंत परतलो, असे विधान त्यांनी केले होते.

भारतात फक्त मोदी तेरी कबर खुदेगीच्या घोषणा दिल्या जात नाहीत. एक इको सिस्टीम तसे प्रयत्नही करते आहे, हे स्पष्ट करणारी ही घटना. भारतातील गद्दारांना हाताशी धरून काहीही करता येऊ शकते हे अमेरिकेला ठाऊक आहे. काँग्रेसची सत्ता परतली तर चीनसोबत सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पुढाकाराने जसा करार झाला, तसा अमेरिकेसोबतही होऊ शकतो. लुटण्यासारखे भारतात बरेच काही आहे, मोदी असताना ते लुटायला मिळत नाही, ही ट्रम्प यांची खंत आहे.
श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्ये त्यांनी सत्ता उलथवण्याचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला. भारत हा मोठा देश. हत्तीवर नियंत्रण मिळवणे सोपे नसते. मादुरो प्रयोगानंतर ट्रम्प यांनी अहं ब्रह्मास्मीचा भास होऊ लागला आहे. ते कोणतेही धाडस करू शकतील. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा नीतीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना फितवण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी आंदोलनासारखे एखादे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न केला जाईल. अगदीच काही जमले नाही तर अल्पसंख्यकांना पेटवून देशात दंगे घडवण्याचा प्रयत्न तर नक्कीच होईल. मेहमूद मदनी यांनी तर जिहादची हाक दिलेली आहे. सध्या दहशतवाद्यांच्यासोबत ट्रम्प यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे भारतात अराजक निर्माण करण्यासाठी जिहादींना हाताशी धरणे त्यांना कठीण नाही.

मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर केलेल्या काही गोष्टींमुळे रिजिम चेंज भारतात थोडे कठिण आहे. एनजीओंना मिळणाऱ्या परदेशी रसदीवर चाप लावण्यात आला आहे. देशात मिशनरी, नक्षलवादी, दहशतवादी, ड्रग्ज माफीया यांची जी साखळी होती, त्यातल्या नक्षलवाद्यांता खात्मा करण्यात केंद्र सरकारला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. दहशतवाद्यांचे पेकाट मोडण्यात आले आहे. परंतु कट्टरवादी, अर्बन नक्षल, विदेशी मिशनरी हे संपलेले नाहीत. फक्त बिळात शिरलेले आहेत.

जॉर्ज सोरोस यांनी एनजीओंच्या माध्यमातून भारतात पत्रकार, एनजीओ, विचारवंत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे एक जाळे निर्माण केले आहे. ट्रम्प आणि सोरोस यांच्यात विस्तव जात नाही हे सत्य आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेच्या रॅकेटीअर इन्फ्लुएन्स्ड एण्ड करप्ट ऑर्गनायझेशन एक्ट अंतर्गत सोरोस पितापुत्रांवर कारवाई कऱण्यात आली होती. ट्रम्प त्यांना मनोरुग्ण म्हणाले होते, हिंसक आंदोलने घडवून ते देश बरबाद करीत असल्याचा ठपकाही ट्रम्प यांनी त्यांच्यावर ठेवला होता.
असले तरी, बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर सोरोस पुत्र एलेक्स सोरोस मोहमद युनस यांना भेटून गेले होते, तेव्हा सत्तेवर ट्रम्प होते, हे कसे विसरता येईल. ट्रम्प यांच्या सत्ताकाळात एलेक्स सक्रीय आहे. त्यामुळे मोदींचा काटा काढण्यासाठी एलेक्स आणि ट्रम्प यांचा वापर होऊ शकतो. हातमिळवणी होईल की नाही हा नंतरचा विषय.

ट्रम्प भारता अराजक निर्माण करू शकतात कारण काँग्रेस नावाचे ट्रम्प कार्ड अमेरिकेच्या हाती आहे. देशातील जेन झी कधी रस्त्यावर उतरते आहे, कधी देशात सत्ता पालट होतो आणि देशाच्या सत्तेवर आपले पॅराशूट लॅडींग होते, याची प्रतीक्षा राहुल गांधी करतायत. ते सत्तेसाठी काहीही करू शकतात. देश के युवा मोदी को डंडे से मारेंगे, असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले होते. ते देशात सतत वोटचोरीचा फंडा मांडण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचा हा फंडा त्यांची सत्ता असलेल्या कर्नाटकातील ८३ टक्के जनतेने त्यांच्याच पक्षाने केलेल्या सर्व्हेत नाकारला होता. परंतु तराही त्याला राहुल गांधी चिकटून आहेत.

बांगलादेशात, नेपाळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या शिळ्या कढीला उकळी आणण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत माईक वॉल्ट्झ यांनी सुरक्षा परीषदेच्या बैठकीत मादुरो यांच्यावर तेच आरोप केले जे राहुल गांधी मोदींवर करतायत, व्हेनेझुएलाचे तथाकथित राष्ट्राध्यक्ष हे व्हेनेझुएलाचे खरे प्रतिनिधी नव्हते, मादुरो आणि त्याच्या चट्याबट्यांनी अनेक वर्षे व्हेनेझुएलाचा सरकारी कारभार प्रभावित करून सत्ता राबवली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा