26 C
Mumbai
Friday, January 2, 2026
घरसंपादकीयमलेशियात बसलेला झाकीर त्या जिहादींचा रोल मॉडेल

मलेशियात बसलेला झाकीर त्या जिहादींचा रोल मॉडेल

मोदी किंवा मोदींची सत्ता हटवणे हे त्यांचे लक्ष्य नाही,तर देशावर हिरवे निशाण फडकवण्याच्या मार्गातील एक टप्पा आहे.

Google News Follow

Related

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका देशव्यापी मोहिमेंतर्गत पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा आणि मध्यप्रदेशात ही कारवाई केली आहे. पुन्हा एकदा देश हादरवणारा रक्तपात करण्याचा हा कट होता. पाकिस्तानी रिंगमास्टरकडून या टोळक्याला सूचना येत होत्या. जिहादी डॉ.झाकीर नाईक हा या युवकांचा प्रेरणास्त्रोत होता. दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे उधळल्या गेलेल्या या कटाला एकाकी पाहता येत नाही. जगभरात सध्या देशादेशातील सरकारांचे तख्तापालट सुरू आहे. ते भारतात घडावे यासाठी काही आशाळभूत डोळे लावून बसले आहेत. अटक केलेल्या जिहादी तरुणांनी झाकीरकडून प्रेरणा घेतलेली आहे. तो सध्या मलेशियात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी काही दिवसांपूर्वी मलेशियात जाऊन आले.

अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या टोळक्याचा म्होरक्या अशहर दानिश असून तो मूळचा रांची येथला आहे. सुफियान अबुबकर खान, आफताब नासीर कुरेशी यांना दिल्लीत अटक कऱण्यात आली असली तरी मूळचे हे दोघेही महाराष्ट्रातील आहेत. तेलंगणातून हुजैफा यमन या बी.फार्मच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे, कामरान कुरेशी याला मध्यप्रदेशातून अटक कऱण्यात आली आहे.

IED तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रॉलिक असिड, नायट्रीक एसिड, सोडीयम बायकार्बोनेट, सल्फर पावडर आदी रसायने, बॉल बेअरींग, तांब्याच्या तारा, सर्कीट, मदरबोर्ड, ऑक्सिजन मास्क, हॅण्ड ग्लोज आयईडी तयार करण्यासाठी लागणारे पार्ट, श्स्त्र, लॅपटॉप, मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या मोबाईल, लॅपटॉपमधून एनक्रिप्टेड चॅट-लॉग्स व डिजिटल पुरावे  सापडले आहेत. बनावट कागदपत्र, ओळखपत्रांचा ही मंडळी वापर करीत होती.

गझ्वा ए हिंद हा त्यांचा उद्देश होता. म्हणजे भारतात शरीयानुसार चालणारी इस्लामी राजवट प्रस्थापित करणे. त्यासाठी देशभरात घातपात करण्याची त्यांची योजना होती. दोन हिंदुत्वादी नेतेही त्यांच्या रडारवर होते. कटाची अंमलबजावणी सुरू असताना हे सगळे कॉर्पोरेट जगतात वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा वापर करीत असत. सिग्नल, ऑमेगल, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांची भरती प्रक्रिया सुरू होती. डॉ.झाकीर नाईक आणि इसरार अहमद यांच्या भाषणातून आपण जिहादची स्फूर्ती घेतल्याची कबुली या जिहादी तरुणांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईतून जे समोर आले त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या तरुणांना १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

पाकिस्तानात बसलेला हॅण्डलर यांच्य संपर्कात होता. हवालाच्या माध्यमातून यांना पैसे पाठवण्यात येत असत. डॉ.झाकीर नाईक याच्या संदर्भात गेल्या  काही दिवसात माध्यमांमध्ये काही आलेले नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र त्याच्याबाबत बरीच माहिती सतत येत असते. त्याला एचआयव्हीची लागण झाली असून तो रुग्णालयात आहे. त्याच्या मुलीला आणि पत्नीलाही एचआयव्हीची लागण झाली आहे, असे वृत्त आहे. देशाचा शत्रू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेला किंवा लपलेला असला तरी तो सुरक्षित नाही, ही इस्त्रालयची नीती कतार मध्ये हमासच्या म्होरक्यातून केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेली आहे. भारतानेही ही नीती वापरण्याची तात्काळ सुरूवात करावी असा सध्याचा काळ आहे.

हे ही वाचा:

नोबेल समिती म्हणते, ट्रम्पकडून दबाव परिणाम करणार नाही!

दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी; मेलमध्ये द्रमुकचा उल्लेख

राहुल गांधी स्वतःला संविधानापेक्षा वरचढ समजतात!

ब्राझील: सत्तापालटाच्या कटासाठी माजी राष्ट्रपतीला २७ वर्षांची शिक्षा!

लोकशाही बाजूला ठेवून देशात जर तख्तापालट करायचा असेल तर हिंसाचार, अराजक हा त्याचा मार्ग असू शकतो. नेपाळ, बांग्लादेशाच्या उदाहरणावरून हे बऱ्यापैकी स्पष्टही झाले आहे. देशात सध्या काही सुरळीत सुरू आहे. जिथे तिथे बॉम्बस्फोट होण्याची परंपरा यूपीएचे सरकार पायउतार झाल्यानंतर संपुष्टात आली आहे. वेगाने सुरू असलेल्या देशाच्या आर्थिक प्रगतीत खोडा घालायचा असेल तर घातपात घडवणे ही देशाच्या शत्रूंची गरज बनली आहे. परंतु त्यांच्या दुर्दैवाने अजित डोवाल यांच्यासारखा मुरलेला स्पाय मास्टर देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी आहे. गृहमंत्री पदी अमित शहा यांच्यासारखा अत्यंत खमका नेता आहे. त्यामुळे गेल्या काही काळात देशात विक्रमी संख्येने घातपाताचे कट उधळले गेले, पाकिस्तानी हेरांना आणि हस्तकांना अटक झाली.

देशांतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार असलेली इंटेलिजन्स ब्युरो आणि बाह्य सुरक्षेची काळजी घेणाऱ्या रिसर्च एण्ड एनालिसिस विंगमध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे देशाच्या वाईटावर उठलेल्यांना कितीही इच्छा असली तरी घातपात घडवणे शक्य होत नाही.

१९९३ मध्ये मुंबईत जे १२ बॉम्बस्फोट झाले त्यातला एक शेअर बाजाराच्या इमारतीत झाला. भारताच्या अर्थकारणाला धक्का देण्याचा हा उघड कट होता. पुन्हा एकदा तसाच प्रय़त्न करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा असू शकतो. एकदा का अर्थकारण डळमळीत झाले की महागाई, बेरोजगारी या सगळ्या समस्या निर्माण होतात. जनतेत असंतोष निर्माण होतो. देश सुरक्षित नाही, अशी बोंब ठोकण्याची संधी विरोधकांना मिळते. हे सगळे शक्य व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने ते यशस्वी होताना दिसत नाहीत. २०१४ ते २०२५ या काळात जम्मू काश्मीर आणि काही प्रमाणात मणिपूर वगळता उर्वरीत देश शांत आहे, त्याचे कारण अजित डोवाल यांच्यापासून अगदी खालच्या टोकाला असलेल्या कॉन्स्टेबलपर्यंत सगळे दक्ष आहेत.

मलेशियात जिवंत असलेला झाकीर नाईक हा मौलाना मसूद अजहरच्या तुलनेत कमी घातक नाही. तो एचआयव्हीने मरणार नाही. भारतात शांतता हवी असेल तर त्याला थंड कऱणे गरजेचे आहे. राहुल गांधी बिहार निवडणुकांची धामधुम अर्धवट सोडून मलेशियातील लॅंगकवी बेटावर गेले होते. तिथे त्यांच्या झाकीर नाईक, उद्योगपती आणि ओपन सोसायटी फाऊंडेशनचा कर्ता जॉर्ज सोरोस यांचा मुलगा अलेक्स सोरोस यांना भेटले अशी सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी तर राहुल गांधी मलेशियात जाऊन झाकीर नाईकला भेटले असा थेट दावा केला आहे.

हे आरोप फक्त राजकीय आकसातून करण्यात आले असे म्हणून सोडून देता येत नाही. राहुल गांधी कधी संसदेचे अधिवेशन तर कधी निवडणुकांचा प्रचार सोडून संशयास्पदरित्या गायब होतात. यावेळी तर ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी जोरात असताना गायब झाले होते. याचा अर्थ बिहारची निवडणूक आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक यापेक्षा राहुल गांधी यांच्या दृष्टीने विदेशात निश्चितपणे काही महत्वाचे असणार. असे काही ज्यामुळे त्यांचे करपलेले राजकारण पुन्हा एकदा बहरू शकेल. त्यांच्या विदेश भेटीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात येते. ही गोपनीयता अनाकलनीय आहे. आपल्या गुप्तचर संस्थांना याची माहिती नसेल हे मानायला मी तयार नाही.

राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी इतके उतावीळ झाले आहेत की ते काहीही करू शकतात. यांनी अनेकदा जाहीरपणे मोदींना हटवण्यासाठी विदेशाच्या भूमीवरून मदत मागितलेली आहे. आणि म्हणूनच दिल्ली पोलिसांच्या कारवाईकडे फक्त देशात काही घातपात करण्याच्या तयारीत असलेले गझ्वा ए हिंदच्या तयारी असलेले काही जिहादी पकडले गेले एवढ्या संकुचित अर्थाने पाहाता येत नाही. एकूणच मोदी सरकार उखडून फेकण्यासाठी देश-विदेशातील ज्या शक्ती काम करतायत, त्यांच्या प्रयत्नांशी या घटनांचा काही संबंध आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. जे मोदी सरकार उखडून टाकण्यासाठी प्रय़त्न करायचा आहे, त्यांना देशातून सनातन धर्म सुद्धा उखडून फेकायचा आहे. जिहादी आणि दहशतवाद्यांचेही तेच उद्दीष्ट आहे. कारण देशात सनातन धर्म अस्तित्वात असे पर्यंत इथे शरीयाची राजवट कधी प्रस्थापित करणार? एक अभद्र युती या देशाच्या विरोधात काम करते आहे. मोदी किंवा मोदींची सत्ता हटवणे हे त्यांचे लक्ष्य नाही, हा या देशावर हिरवे निशाण फडकवण्याच्या मार्गातील एक टप्पा आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा