दित्वाह चक्रीवादळामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीतून सावरण्यासाठी भारत सातत्याने श्रीलंकेला मदत करत आहे. ऑपरेशन सागर बंधु अंतर्गत भारतीय सेनेने श्रीलंकेत आवश्यक कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल करण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. भारतीय सेनेच्या एका इंजिनीयर टास्क फोर्सने जाफना येथे चिलाव आणि किलिनोच्ची येथील पुलांच्या ठिकाणी बेली ब्रिज उभारण्याची तयारी सुरू केली आहे. ही टास्क फोर्स श्रीलंकन सेना आणि श्रीलंका रोड डेव्हलपमेंट अथॉरिटीसोबत समन्वय साधून काम करत आहे. प्रभावित भागात रस्ते संपर्क पूर्ववत करण्यासाठी बेली ब्रिज उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भारतीय सेनेने दिली आहे.
शुक्रवारी, ऑपरेशन सागर बंधु अंतर्गत भारतीय सेनेची इंजिनीयर टास्क फोर्स एअर लिफ्ट करण्यात आली असून, आवश्यक इंजिनीयरिंग सहाय्यासाठी युद्धपातळीवर तैनात करण्यात आली आहे. ४८ सदस्यांच्या या टास्क फोर्सचे मुख्य उद्दिष्ट खराब रस्ते व पूल दुरुस्त करणे तसेच संपर्कासाठी महत्त्वाच्या मार्गांची पुनर्बांधणी करणे आहे. या पथकात विशेष ब्रिजिंग तज्ज्ञ, सर्व्हेयर, वॉटरमॅनशिप स्पेशालिस्ट यांच्यासह जड अर्थ-मूव्हिंग उपकरणे, ड्रोन आणि ड्रायव्हरविरहित प्रणाली हाताळण्यात प्रशिक्षित कर्मचारी आहेत. टास्क फोर्सकडे सध्या बेली ब्रिजचे ४ सेट उपलब्ध असून, ते भारतीय हवाई दलाच्या सी-१७ विमानांद्वारे एअर लिफ्ट करण्यात आले आहेत.
हेही वाचा..
भारतीय शेअर बाजाराची आठवड्यात चांगली कामगिरी
ऊर्जा संरक्षण हेच सर्वाधिक पर्यावरणपूरक आणि ऊर्जेचा सर्वात विश्वासार्ह स्रोत
महाज्योतीमार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन -ऑफलाईन प्रशिक्षण
कौशल्य विकास, प्रशिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी
याशिवाय, ऑपरेशनल क्षमता वाढवण्यासाठी न्यूमॅटिक बोटी, आउटबोर्ड मोटर्स, एचईएससीओ बॅग्स तसेच हेवी-पेलोड ड्रोन आणि रिमोट कंट्रोल बोटींसारखी अत्याधुनिक साधने पथकाकडे उपलब्ध आहेत. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे कँडीजवळील महियांगनया येथे उभारलेले भारतीय सेनेचे फील्ड हॉस्पिटल बंद करण्यात येत आहे, कारण तेथील स्थानिक आरोग्य सेवा आता पूर्ववत झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरील पोस्टमध्ये अॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन (एडीजीपीआय) यांनी सांगितले, “दित्वाहवादळ नंतर कँडीजवळील महियांगनया येथे उभारलेले फील्ड हॉस्पिटल बंद करण्यात येत आहे, कारण महियांगनया जनरल हॉस्पिटल पुन्हा कार्यरत झाले आहे. फील्ड हॉस्पिटलमधील मेडिकल टीमचे ७८ सदस्य उद्या (१४ डिसेंबर) भारतात परतणार आहेत.”
श्रीलंकेतील भारतीय उच्चायोगानेही एक्सवर माहिती दिली की, “उच्चायुक्त संतोष झा यांनी १२ डिसेंबर रोजी उवा प्रांताचे गव्हर्नर कपिला जयशेखर यांच्यासोबत फील्ड हॉस्पिटलला भेट दिली. या कठीण काळात मदत करण्यासाठी भारताच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचा हा भाग आहे.”







