23.5 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरदेश दुनियाडोनाल्ड ट्रम्प बनले व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष? नेमकं प्रकरण काय?

डोनाल्ड ट्रम्प बनले व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष? नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चा

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या त्यांच्या विविध वक्तव्यांसाठी आणि ते घेत असलेल्या निर्णयांसाठी सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. अशातच ते आता पुना एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे. अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टद्वारे स्वतःला “Acting President of Venezuela, Incumbent January 2026” असे घोषित केले आहे. हा दावा त्यांनी एका प्रतिमेच्या माध्यमातून केला असून ती प्रतिमा विकिपीडिया प्रोफाइलसारखी दिसत आहे.

पोस्ट केलेल्या चित्रात ट्रम्प यांचा अधिकृत पोर्ट्रेट दिसतो, ज्यामध्ये त्यांना व्हेनेझुएलाचे “कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष” म्हणून दाखवण्यात आले आहे, तसेच अमेरिकेचे ४५ वे आणि ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळही नमूद करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष विकिपीडिया पेजवर ट्रम्प यांना व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हटलेले नाही आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्था किंवा देशाने या दाव्याला मान्यता दिलेली नाही. ट्रम्प यांचे हे विधान अमेरिका व्हेनेझुएलाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडून हटविण्यात आल्यानंतर आले आहे. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला न्यूयॉर्कला नेण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर संघीय ड्रग तस्करी आणि नार्को-टेररिझमच्या आरोपांखाली खटला चालवला जात आहे.

तेलसमृद्ध व्हेनेझुएलाविरोधात गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचा दबाव, आर्थिक निर्बंध आणि लष्करी हालचाली सुरू होत्या. त्यानंतरच मादुरो यांना हटविण्यात आले. मादुरो यांनी ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत आपले अपहरण झाल्याचा दावा केला आहे. या घडामोडींवर चीन, रशिया, कोलंबिया आणि स्पेनसह अनेक देशांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, अमेरिकेच्या पावलांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन ठरवले आहे.

मादुरो यांना हटविल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी घोषणा केली की, व्हेनेझुएलाच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे आणि नियंत्रित सत्तांतराची गरज लक्षात घेता अमेरिका तात्पुरत्या स्वरूपात देशाचा कारभार सांभाळेल. या अंतरिम काळात व्हेनेझुएलाच्या तेल उत्पादन, त्यावरील देखरेख आणि जागतिक बाजारात विक्रीची जबाबदारी अमेरिकेकडे असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, व्हेनेझुएलामध्ये मादुरो यांच्या सहकारी आणि उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेझ यांनी अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. रोड्रिगेझ यांनी अमेरिकेचे दावे साफ फेटाळून लावत मादुरो यांच्या तात्काळ सुटकेची मागणी केली आणि त्यांनाच देशाचा वैध नेता म्हटले. याला प्रत्युत्तर देताना ट्रम्प यांनी इशारा दिला की, रोड्रिगेझ यांनी अमेरिकेसोबत सहकार्य केले नाही तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल; त्यांच्यावरची कारवाई मादुरोपेक्षाही कठोर असू शकते, असेही ट्रम्प म्हणाले.

हेही वाचा..

साबरमती काठी मोदींसह जर्मन चान्सलर मर्झ यांनी उडवले पतंग

इराणी राजवटीविरुद्धच्या निदर्शनांदरम्यान ट्रक घुसला; अनेक जण जखमी

जम्मू काश्मीरच्या सांबा, राजौरी, पूंछ जिल्ह्यांमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन

एलन मस्क करणार ‘एक्स’चा नवा अल्गोरिदम सार्वजनिक

ट्रम्प यांनी अमेरिकन तेल कंपन्यांना व्हेनेझुएलामध्ये तेल उत्पादन वाढवण्यासाठी १०० अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. व्हाइट हाऊसमध्ये तेल उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की, व्हेनेझुएलामध्ये कोणत्या कंपन्या काम करतील हे अमेरिका ठरवेल आणि देशाच्या जीर्ण तेल क्षेत्राच्या पुनर्बांधणीला मदत करेल. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अंतरिम नेतृत्वाशी झालेल्या एका कराराचेही कौतुक केले, ज्यानुसार अमेरिकेला ५० दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा केला जाणार आहे. हा पुरवठा अनिश्चित काळापर्यंत सुरू राहू शकतो आणि त्यामुळे अमेरिकेतील ऊर्जा किमती कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, अमेरिकेत साठवलेल्या व्हेनेझुएलाच्या तेलाच्या विक्रीशी संबंधित निधीचे संरक्षण करण्यासाठी ट्रम्प यांनी एका कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा