31 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरदेश दुनियामहाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले

महाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले

महाराष्ट्र सदनाद्वारे सुदान येथून परत आणलेल्या नागरिकांना सुखरूप स्वगृही पाठवण्यात येईल.

Google News Follow

Related

सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत पालम वायुसेना विमानतळावर वायुसेनेचे विशेष विमान (सी-१७) ४०० भारतीय नागरिकांना घेऊन दाखल झाले आहे. यात महाराष्ट्रातील १९ नागरिकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या सहकार्य कक्षाच्या माध्यमातून सुदान येथून परत आणलेल्या नागरिकांना सुखरूप स्वगृही पाठवण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरू करण्यात आला आहे. सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य

दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार राज्यातील त्यांच्या घरापासून नजिकच्या गंतव्यस्थळी पोहचवण्यासाठी कक्षाद्वारे समन्वयाचे कार्य होत आहे. विमानतळावर स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या नागरिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पोलिसांनी पानटपऱ्या कातरल्या; ५०० दुकानांवर कारवाई

३२ वर्षीय महिलेचा छळ करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटक

बारसूत शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण

पालघर साधू हत्याकांडाच्या पापाचा हिशोब होणार

सुदानमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील नागरिकांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहोचता यावे, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा