भारतात नोव्हेंबर २०२५ मध्ये डील्स अॅक्टिव्हिटीमध्ये विक्रमी वाढ नोंदवली गेली. आयपीओ आणि क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल प्लेसमेंट्स (क्यूआयपी) मिळून एकूण २७० व्यवहार झाले असून त्यांची एकूण किंमत ११.४ अब्ज डॉलर्स इतकी आहे. ग्रँट थॉर्नटन इंडियाच्या ताज्या डीलट्रॅकर अहवालानुसार, ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक डील्स संख्या असून, मोठ्या व्यवहारांमध्ये काहीशी मंदी असली तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवरील गुंतवणूकदारांचा मजबूत विश्वास यावरून दिसून येतो.
अहवालानुसार, नोव्हेंबरमध्ये खासगी बाजारातही २५२ व्यवहार झाले असून त्यांची एकूण किंमत ६.७ अब्ज डॉलर्स होती. एकूण व्यवहारांची संख्या ऑक्टोबरच्या तुलनेत २४ टक्क्यांनी वाढली, मात्र व्यवहारांच्या मूल्यामध्ये ३२ टक्क्यांची घट झाली. नोव्हेंबरमध्ये १.१ अब्ज डॉलर्स मूल्याचे ९९ विलीनीकरण आणि अधिग्रहण (एमअँडए) व्यवहार झाले, जी आतापर्यंतची सर्वाधिक मासिक एमअँडए व्यवहारसंख्या आहे. मात्र, मोठ्या व्यवहारांचा अभाव असल्यामुळे एकूण मूल्य कमी झाले. यामध्ये ८५ टक्के व्यवहार देशांतर्गत होते, तर ११ टक्के व्यवहार आऊटबाउंड होते, ज्यातून भारतीय कंपन्यांच्या जागतिक विस्ताराच्या योजनांचे संकेत मिळतात.
हेही वाचा..
पाकिस्तानवर आता ग्लोबल अॅक्शन?
वज्रदंती : दात व हिरड्यांसाठी आयुर्वेदातील रामबाण औषधी
महिलांशी गैरवर्तन : आरोपी अटकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी ओमानमध्ये दाखल
या महिन्यात १५३ प्रायव्हेट इक्विटी व्यवहार झाले असून त्यांची एकूण किंमत ५.५ अब्ज डॉलर्स इतकी होती. जून २०२२ नंतरची ही सर्वाधिक मासिक पीई मूल्य आहे. यामध्ये ब्रूकफिल्ड इंडिया आरईआयटीकडून अर्लिगा इकोवर्ल्ड बिझनेस पार्क्समध्ये १.४९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि टीपीजी राइज क्लायमेटकडून हायपरव्हॉल्ट एआय डेटा सेंटरमध्ये १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक यांसारख्या मोठ्या प्रकल्पांचा मोठा वाटा होता. बँकिंग, वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि आयटी सेवा क्षेत्रांचा पीई मूल्यामध्ये ८० टक्क्यांहून अधिक वाटा राहिला.
नोव्हेंबरमध्ये आयपीओ अॅक्टिव्हिटी मागील महिन्याच्या तुलनेत थोडीशी मंदावली. ११ आयपीओंनी मिळून ३.७ अब्ज डॉलर्स उभारले, तर ७ क्यूआयपींनी १.१ अब्ज डॉलर्सची फंडिंग केली. एकूणच सार्वजनिक बाजारातून कंपन्यांनी ४.८ अब्ज डॉलर्सची उभारणी केली असून, यामध्ये किरकोळ व्यापार, बँकिंग, ऑटोमोबाईल आणि शिक्षण क्षेत्रातील कंपन्यांचा प्रमुख वाटा आहे. किरकोळ आणि ग्राहक क्षेत्रातील कंपन्यांनी ४७ व्यवहारांद्वारे ३४१ दशलक्ष डॉलर्सचे व्यवहार केले. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्राने ३७ व्यवहारांद्वारे १.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करत मूल्याच्या दृष्टीने सर्वाधिक योगदान दिले.







