27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरक्राईमनामाधक्कादायक!! अमेरिकेत ट्रकमध्ये सापडले ४६ मृतदेह

धक्कादायक!! अमेरिकेत ट्रकमध्ये सापडले ४६ मृतदेह

Related

अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र असताना आता अजून एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये हादरवून टाकणारी घटना घडली आहे. टेक्सास येथील सॅन अंटोनिओ या भागात एका ट्रकमध्ये ४० पेक्षा जास्त मृतदेह सापडले आहेत. या मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नसून मृतदेहांनी भरलेला ट्रक पाहून पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

सॅन अंटोनिओ शहरातील दक्षिणेकडे रेल्वे रुळाच्या बाजूला एका ट्रकमध्ये एकूण ४६ मृतदेह सापडले आहेत. रेल्वे रुळाजवळ हा ट्रक आडोशाला उभा होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी तपास अजून सुरू आहे. एकाच वेळी तब्बल ४६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

कुर्ल्यात चार मजली इमारत कोसळली; २० जण अडकले

“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विजय”

“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

एकनाथ शिंदे गटावरील अपात्रतेची टांगती तलवार तूर्तास दूर

या लोकांचा मृत्यू का झाला? हा नैसर्गिक मृत्य आहे की हत्या? हे स्पष्ट झाले नसून टेक्सास आणि सॅन अंटानिओ पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा