31 C
Mumbai
Tuesday, November 12, 2024
घरदेश दुनियातालिबानी सरकारला नको पोलिओ लसी; आणली स्थगिती

तालिबानी सरकारला नको पोलिओ लसी; आणली स्थगिती

संयुक्त राष्ट्रांनी दिली माहिती

Google News Follow

Related

तालिबानने अफगाणिस्तानमधील पोलिओ लसीकरण मोहिमेला स्थगिती दिल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन देश आहेत ज्यांच्यातून अजूनही पोलिओ आजाराचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे तालिबान सरकारचा हा निर्णय म्हणजे पोलिओ निर्मूलनासाठीच्या मोहिमेसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने पोलिओ लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी सोमवार, १६ सप्टेंबर रोजी दिली आहे. या मोहिमेला स्थगिती देणे म्हणजे अफगाणिस्तानातील पोलिओ निर्मूलनासाठी मोठा धक्का आहे, असे मानले जात आहे. मात्र, मोहिमेला स्थगिती देण्याचे कारण तालिबानी सरकारकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान, पोलिओचा सर्वाधिक धोका असणाऱ्या दोन देशांपैकी अफगाणिस्तान एक आहे. तर दुसरा देश पाकिस्तान आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या वर्षी अफगाणिस्तानमध्ये १८ पोलिओ प्रकरणांची पुष्टी केली आहे. २०२३ पेक्षा सहा अधिक प्रकरणे आढळली आहेत. जागतिक पोलिओ निर्मूलन पुढाकार अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये घरोघरी पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्याबाबत चर्चा झाली होती, असे जागतिक आरोग्य संघटनेमधील डॉ. हमीद जाफरी यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : 

 

कावड यात्रेला विरोध केल्याने हिंदूंनी ईदची मिरवणूकही रोखली !

यूपीमध्ये लव्ह जिहाद, आरोपी मोहम्मद आझम झैदीला अटक !

उद्योगपतीला वाचविण्यासाठी तीन आयपीएस अधिकारी महिलेला छळत होते!

अफगाणिस्तानमध्ये देशव्यापी पोलिओ निर्मूलन मोहिम जून २०२४ मध्ये राबवली गेली. अफगाणिस्तानने पाच वर्षात प्रथमच घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम राबवली गेली. याचा फायदा बहुसंख्य मुलांना झाला. दक्षिण कंदाहार प्रांत, तालिबानचा म्होरक्या हिबतुल्ला अखुंदजाद याचा तळ, मशिदी-ते-मशीद लसीकरण मोहिम राबवली गेली. लसीकरण मोहिमेमध्ये एकूण महिलांचा समावेश अफगाणिस्तानमध्ये सुमारे वीस टक्के आहे,”, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

अफगाणिस्तान प्रमाणेच पाकिस्तानमध्येही पोलिओची समस्या असून पोलिओविरोधी मोहिमेवर नियमितपणे हिंसाचार होत असतात. दहशतवादी लसीकरण पथके आणि त्यांच्या संरक्षणासाठी नेमलेल्या पोलिसांना लक्ष्य करतात तसेच मुलांची नसबंदी करण्याचा पाश्चात्य कट असल्याचा खोटा दावा करत पोलिओ मोहिमेला विरोध केला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा