29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरदेश दुनियाअमृता फडणवीस यांचे देशभक्तीपर नवीन गीत

अमृता फडणवीस यांचे देशभक्तीपर नवीन गीत

नेटकऱ्यांनी दिला चांगला प्रतिसाद

Google News Follow

Related

अमृता फडणवीस यांचे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर अमृता फडणवीस यांचे हे ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गाणं शेअर करण्यात आलं आहे.
गायिका अमृता फडणवीस सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. अमृता यांनी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला त्यांनी गायलेल्या देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ विविध सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांचे हे देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ‘सारे जहाँ से अच्छा’ या नव्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून प्रजासत्ताक दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. ‘सारे जहाँ से अच्छा’ देशभक्तीपर गीत गाण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. या गाण्याला सत्य कश्यप यांनी संगीत दिलं असून अमृता यांच्या शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून चांगल्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.

 

टी-सीरिजच्या या युट्यूब चॅनलवर अमृता फडणवीस यांचे ‘सारे जहाँ से अच्छा’ हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. सत्या कश्यप यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. ‘द न्यू ब्लड भारतीयान्स’ या अल्बममधील हे गाणं आहे. या गाण्याला आतापर्यंत बारा मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या गाण्याला लाईक केलं आहे.

हे ही वाचा:

दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन

१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी

लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण

पंतप्रधान मोदींनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली

अमृता फडणवीस यांची गाणी
अमृता फडणवीस यांचं ‘मूड बना लिया’ हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. या गाण्याला मीट ब्रदर्स यांनी संगीत दिलं आहे. तर कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यांच्या ‘वो तेरे प्यार का गम’ या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी अशी उत्तम गाणी गायली आहेत.
अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी बस बाई बस, किचन कलाकार या टीव्ही कार्यक्रमामध्ये अमृता फडणीस यांनी हजेरी लावली. होती त्यालाही चांगला प्रतिसाद होता

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा