31 C
Mumbai
Sunday, February 1, 2026
घरदेश दुनियाअसीम मुनीर यांनीचं लष्कराला दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याचे आदेश दिलेले!

असीम मुनीर यांनीचं लष्कराला दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याचे आदेश दिलेले!

जैशचा कमांडर काश्मिरी याने पाक लष्कराचा दुटप्पी चेहरा केला उघड

Google News Follow

Related

जैश-ए-मोहम्मद (जेईएम) कमांडर मसूद इलियास काश्मिरी याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याचे आदेश उच्च अधिकाऱ्यांना दिले होते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये काश्मिरी याने खुलासा केला की, पाकिस्तानी लष्कराच्या जनरल मुख्यालयाने वरिष्ठ कमांडरना मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना लष्करी प्रोटोकॉल देऊन सन्मानित करण्याचे निर्देश दिले होते. जीएचक्यूने शहीदांना शेवटची सलामी देण्याचे निर्देश दिले आणि कॉर्प्स कमांडर्सना गणवेशात अंत्यसंस्कार विधिवेळी उपस्थित राहण्याचे आणि पहारा देण्याचे आदेश दिले होते. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची दुटप्पी भूमिका समोर आली असून दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तान करत असल्याचे उघड झाले आहे.

काश्मिरी याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये, इलियास काश्मिरीने दिल्ली आणि मुंबईसह भारतीय भूमीवरील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मसूद अझहरचा सहभाग असल्याची पुष्टी केली होती. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आणि शत्रूंच्या तावडीतून सुटल्यानंतर, जेव्हा अमीर-उल-मुजाहिदीन मौलाना मसूद अझहर पाकिस्तानात आला, तेव्हा बालाकोटच्या मातीने त्याला दिल्ली आणि मुंबईत त्याचे ध्येय आणि त्याचे कारण पुढे नेण्यासाठी बळ दिले. ही माती, तिचा प्रत्येक कण, त्याचा ऋणी आहे.” तसेच समोर आलेल्या आणखी एका क्लिपनंतर स्पष्ट झाले आहे की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हल्ल्यांनी बहावलपूरमधील मसूद अझहरच्या कुटुंबाला उध्वस्त केले आहे.

हे ही वाचा:

साबरमती नदीकाठच्या ७०० हून अधिक अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर कारवाई

दिशा पटानी गोळीबार: हल्लेखोरांकडे सापडले पाकिस्तानी ड्रोनद्वारे तस्करी केलेले तुर्की पिस्तूल

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ईव्हीएम मतपत्रिकांच्या लेआउटमध्ये केले ‘हे’ बदल 

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस: राज्यातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न!

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, ज्यात पर्यटक होते. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने बहावलपूर, कोटली आणि मुरीदकेसह नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. या लक्ष्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि हिजबुल मुजाहिदीनचे कॅम्प्स समाविष्ट होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा