27 C
Mumbai
Sunday, April 5, 2026
घरदेश दुनियाइराणच्या बुशहर अणुऊर्जा प्रकल्प आणि पेट्रोकेमिकल हबवर हल्ला

इराणच्या बुशहर अणुऊर्जा प्रकल्प आणि पेट्रोकेमिकल हबवर हल्ला

हल्ल्यात एक ठार, पाच जखमी

Google News Follow

Related

अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात इराणमधील बुशहर अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले. तसेच ‘महशहर’ येथील पेट्रोकेमिकल हबवरही हल्ला झाला, ज्यात पाच जण जखमी झाले आहेत. न्यूज एजन्सीनुसार, या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून प्रकल्पाशी संबंधित काही इमारतींचे नुकसान झाले आहे. मात्र, अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य भागाला कोणतीही हानी पोहोचलेली नाही आणि कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही, असेही सांगण्यात आले आहे.

युद्ध सुरू झाल्यापासून या प्रकल्पावर झालेला हा चौथा हल्ला असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अमेरिका आणि इस्रायल यांनी या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, इराणच्या पेट्रोकेमिकल हबवर झालेल्या हवाई हल्ल्यात पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, दक्षिण-पश्चिम इराणमध्ये यापूर्वीही पेट्रोकेमिकल हबवर इस्रायली हवाई हल्ले झाले होते. इस्रायली मीडिया हाऊस ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने हे हल्ले इस्रायली वायुदलाने केल्याची पुष्टी दिली आहे.

फार्स न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार, खुजेस्तान प्रांतातील महशहर पेट्रोकेमिकल विशेष क्षेत्रातील अनेक ठिकाणी हल्ले झाले. खुजेस्तान प्रांताचे उपराज्यपाल वलियोल्लाह हयाती यांनी सांगितले की, या हल्ल्याचा परिणाम तीन कंपन्यांवर झाला आहे. नुकसानाचे नेमके प्रमाण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ते पुढे म्हणाले की, या हल्ल्यांमध्ये पाच जण जखमी झाले असून मृत्यूबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट नाही.

हे ही वाचा:

राघव चढ्ढा म्हणाले, घायल हूं इसलीए घातक हूं

३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करा!

‘भाजपला मतदान करू नका…’ मतदारांना धमकावणारा तृणमूलचा कार्यकर्ता अटकेत

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘हिंदू- काल आणि आज’ या विषयावर व्याख्यान

दरम्यान, गेल्या आठवड्यात ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने आपल्या अहवालात दावा केला होता की, इस्रायलच्या राजकीय नेतृत्वाने आयडीएफला इराणमधील “आर्थिक केंद्रांवर” हल्ले करण्याचे निर्देश दिले होते, ज्याचा उद्देश इराणची आर्थिक कंबर मोडणे हा होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा