28 C
Mumbai
Sunday, March 22, 2026
घरदेश दुनियाभारतात धुरंधरची धूम; पाकिस्तानात दहशतवाद्याचा काटा काढला

भारतात धुरंधरची धूम; पाकिस्तानात दहशतवाद्याचा काटा काढला

लष्कर ए तैयबाच्या बिलालला केले ठार

Google News Follow

Related

एकीकडे भारतात आणि परदेशातही धुरंधर २ द रिव्हेन्जची धूम आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा काटा एक भारतीय गुप्तहेर कसा काढतो याची ती कहाणी आहे. मात्र त्याचवेळी पाकिस्तानात लष्कर ए तैयबाचा एक दहशतवादी बिलाल आरिफ सलाफी याचा काटा कुणीतरी काढल्याचे वृत्त आहे. बिलाल हा लष्करचा कमांडर होता.

पाकिस्तानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  या दहशतवादी संघटनेचा कमांडर बिलाल आरिफ सलाफी याची लाहोरजवळील मुरीदके येथील मरकज तैयबा मुख्यालयात ईदच्या नमाजानंतर गोळ्या झाडून आणि चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

हल्ला दोन व्यक्तींनी केला त्यात एका पुरुषाने जवळून गोळीबार केला. एका महिलेनं वारंवार चाकूने हल्ला करून त्याला ठार केले.

हे ही वाचा:

पश्चिम आशियातील तणाव शिगेला; मोदींचा इराणला स्पष्ट संदेश

दलाल स्ट्रीटवर परदेशी गुंतवणूकदारांचा मोठा ‘एग्झिट’

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची सिडनीतील मशिदीत उडविली हुर्यो

दलाल स्ट्रीटवर परदेशी गुंतवणूकदारांचा मोठा ‘एग्झिट’

घटनेतील महत्त्वाचे मुद्दे

ईदच्या नमाजासाठी संघटनेचे अनेक वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. हल्ल्यानंतर सलाफीला रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. व्हिडिओमध्ये तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो.काही वरिष्ठ नेत्यांमध्ये गोंधळ आणि तणाव दिसून आला

हत्येमागील शक्यता

हल्ल्याचे कारण स्पष्ट नाही पण संघटनेतील अंतर्गत गटबाजी किंवा सत्तासंघर्ष असण्याची शक्यता. महिलेला सहभागी करून घेतल्यामुळे हा पूर्वनियोजित अंतर्गत हल्ला असू शकतो.

सलाफी हा २००५ पासून संघटनेशी संबंधित आहे आणि निधी उभारणीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. शस्त्रे खरेदी आणि दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत उभी करत होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा