पंतप्रधान मोदींना कॅनडाच्या पंतप्रधानांचा फोन, G-७ शिखर परिषदेसाठी दिले आमंत्रण!

पंतप्रधान मोदींनी दिली माहिती 

पंतप्रधान मोदींना कॅनडाच्या पंतप्रधानांचा फोन, G-७ शिखर परिषदेसाठी दिले आमंत्रण!

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. सोशल मीडियावर माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांना मार्क कार्नी यांचा फोन आला आणि त्यांनी भारताला जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. दरम्यान, भारत आणि कॅनडामधील बिघडलेल्या संबंधांमुळे यावेळी भारत जी-७ शिखर परिषदेच्या टेबलावर दिसणार नाही, असा अंदाज वर्तवला जात होता. तथापि, भारताला जी-७ शिखर परिषदेपासून दूर ठेवता आले नाही.

पंतप्रधान मोदी म्हणाले, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचा फोन आल्याने आनंद झाला. अलिकडच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि या महिन्याच्या अखेरीस कनानास्किस येथे होणाऱ्या G-७ शिखर परिषदेसाठी आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांनी मार्गदर्शन करून नव्या जोमाने एकत्र काम करतील. या शिखर परिषदेतील आमच्या बैठकीची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत.

२०२३ मध्ये कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी निज्जरच्या हत्येसाठी भारतावर निराधार आरोप केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढला होता. अंतर्गत विरोधामुळे जस्टिन ट्रूडो यांना नंतर राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मार्क कार्नी यांना पंतप्रधान बनवण्यात आले. त्यांनी एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला.

हे ही वाचा : 

वडिलांच्या नावावर काहीजण फुशारक्या मारतात!

राज-उद्धव युतीशी माझा संबंध नाही! तेच प्रतिक्रिया देतील

शर्मिष्ठा पानोली आणि खदिजा शेख प्रकरणात न्यायालयांचा कोणता दृष्टिकोन योग्य?

“क्रिकेटचा फिरकीपटू थांबला… पियुष चावला निवृत्त!”

दरम्यान, या वर्षीची जी-७ शिखर परिषद १५ ते १७ जून दरम्यान कॅनडातील अल्बर्टा प्रांतातील कनानास्किस येथे होत आहे. जी-७ हा जगातील सात सर्वात मोठ्या विकसित अर्थव्यवस्थांचा गट आहे, ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान यांचा समावेश आहे. भारताला आमंत्रित करणे हे या गटासाठी भारताची वाढती जागतिक भूमिका देखील प्रतिबिंबित करते.

Exit mobile version