शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे आगामी काळात एकत्र येतील अशी चर्चा असताना आज (६ जून) उद्धव ठाकरेंनी आपल्या प्रत्रकार परिषदेत केलेल्या विधानामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर येत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राज ठाकरे प्रतिक्रिया देतील मी कशी काय प्रतिक्रिया देवू?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राज ठाकरे प्रतिक्रिया देतील मी कशी काय देवू? त्यामध्ये माझा काय संबंध? ते आपापसात ठरवतील. साद, प्रतिसाद, प्रतिक्रिया काय द्यायचे हे ते ठरवतील.
ते पुढे म्हणाले, यावर आता तरी काही प्रतिक्रिया द्यावी असे मला वाटत नाही. तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसते?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, योग्य वेळी मी सांगेन. मी माझा राजकीय अनुभव वारंवार सांगत नसतो, तो उचित वेळी सांगत असतो.
दरम्यान, १२ नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले, यावर ते म्हणाले, एक करोड पेक्षा जास्त किमतीचे बक्षीस असणाऱ्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षलवाद्यांची कंबर मोडली आहे, हे स्पष्ट होते. त्यांच्या आता लक्षात आले आहे कि ज्या गोष्टींकरिता ते हिंसा करत होते ते मृगजळ होते. त्यांनी आता भारताच्या संविधांवर पूर्ण विश्वास दाखवत मुख्य धारेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच पूर्ण गणवेशात, शश्त्रासहित आत्मसमर्पण झाले आहे. उरलेल्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले तर त्यांचे जीवन चांगले होईल नाही केले तर कारवाई तर केलीच जाईल.
हे ही वाचा :
शर्मिष्ठा पानोली आणि खदिजा शेख प्रकरणात न्यायालयांचा कोणता दृष्टिकोन योग्य?
मिशेल स्टार्कने आयपीएल २०२५ मधून बाहेर राहण्याचे केले समर्थन
“क्रिकेटचा फिरकीपटू थांबला… पियुष चावला निवृत्त!”
महाराष्ट्राच्या जनेतेचे मन आणि उद्धव ठाकरेंचे मन एकत्र नाही!
तसेच यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्या १३ नक्षलवादी जोडप्यांचा लग्न सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आशीर्वाद दिले. ते म्हणाले, जंगलामध्ये हत्यारं घेवून संघर्ष करणारे आता वैवाहिक जीवनामध्ये अडकून आपले नवीन जीवन सुरु करत आहेत, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पुनर्वसन हे केवळ आपल्या भाषणापुरते नाही तर सर्वार्थाने आपण पुनर्वसन करत आहोत हे यातून स्पष्ट होते. १३ जोडप्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो.
