महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, आता संकेत नाही तर बातमीच देतो, या उद्धव ठाकरेंच्या विधानाने आगामी काळात ठाकरे बंधू येण्याची शक्यता आता जोर धरू लागली आहे. मात्र, काही सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांकडून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर अनेक नेत्यांनी ठाकरेंच्या एकत्रित येण्यावर स्वागत केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या जनेतेचे मन आणि उद्धव ठाकरेंचे मन एकत्र नसल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
दरेकर म्हणाले, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट सांगितले आहे कि मागच्या दोन निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एकत्र यावे असे वाटते होते. पण त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळेच होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे आजचे मत हे तकलादू प्रकारचे आहे असे मला वाटते.
महाराष्ट्राच्या जनेतेचे मन किंवा मत हे निवडणुकीवर व्यक्त होत असते. मागच्या दोनही निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा आणि महायुतीला मत दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनमन हे महायुतीच्या बाजूने आहे. तथापि, राज्याच्या राजकीय संस्कुती, परंपरा, कुटुंबवात्सल्य महाराष्ट्र या जर एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे. कारण “वसुधैव कुटुंबकम” मानणारे आपण लोक आहोत.
पण जर राजकीय दृष्ट्या समीकरणे पाहिली तर हे कितपत वर्किंग होईल यावर मी स्वतः साशंक आहे. कारण बाळासाहेबांची हिंदुत्वाची विचारधारा सोडून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या विचारधारेला कवटाळलं आहे. मविआच्या विळख्यात ते आहेत. अशा वेळेला राज ठाकरे काँग्रेसच्या विचारधारेसाहित त्यांच्याबरोबर येतील असे वाटत नाही. तथापि, कुटुंब म्हणून ते एकत्र होत असतील तर आम्हाला दुःख नाही तर आनंदच आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
हे ही वाचा :
चीनला वठणीवर आणणाऱ्या प्रकल्पांना काँग्रेसचा विरोध काय सांगतो???
नूर खान एअरबेसवर अमेरिकेचे नियंत्रण…पाक सुरक्षा तज्ज्ञाच्या दाव्यामुळे खळबळ
सिंधू करार बंदीमुळे पाकचा घसा कोरडा, भारताला लिहिली चार पत्रे!
आयफेल टॉवरपेक्षाही उंच चिनाब पूल झाला खुला!
दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो. आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
