जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेली कारवाई पाकिस्तान जन्मात विसरू शकत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’मार्फत केलेला हल्ला, सिंधू करार रद्दसह इतर गोष्टींमुळे पाकिस्तान संतापला आहे. सिंधू करार रद्द केल्यानंतर भारताला वारंवार धमक्या देण्यात आल्या, भीती दाखवण्यात आली. मात्र, भारताने पाकच्या अशा फुसक्या धमक्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. अशा परिस्थितीमुळे पाकिस्तान नरमला असून सिंधू करार कायम ठेवण्याची मागणी करत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकने भारताला पत्रही लिहिली आहेत.
पाकिस्तानने आतापर्यंत भारताला चार पत्रे लिहिली आहेत. या पत्रांमध्ये पाकिस्तानने भारताला सिंधू पाणी करार थांबवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या आधी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानच्या जल मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय बदलण्यासाठी भारताला पहिले पत्र लिहिले होते. त्यानंतर, पाकिस्तानच्या जल मंत्रालयाच्या सचिवांनी आणखी तीन पत्रे लिहून भारताला सिंधू पाणी करार कायम ठेवण्याची विनंती केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जलशक्ती मंत्रालयाने सर्व पत्रे परराष्ट्र मंत्रालयाला पाठवली आहेत.
हे ही वाचा :
आयफेल टॉवरपेक्षाही उंच चिनाब पूल झाला खुला!
अभिनेता दिनो मोरियाच्या घरावर ईडीची धाड!
दिल्ली: बकरी ईदला गायी आणि उंटांच्या कुर्बानीवर बंदी!
तेव्हाच महाराष्ट्र हित जपता आलं नसतं का?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट केले होते की व्यापार आणि दहशतवाद, पाणी आणि रक्त, गोळ्या आणि शब्द एकत्र चालू शकत नाहीत. तसेच दोन्ही देशांच्या समस्येमध्ये तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप चालणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पाकचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्र्यांनी भारतासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शवली आहे. परंतु, या नेत्यांकडून भारताला धमक्या देखील दिल्या जात आहेत.
