भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-७ परिषदेसाठी कॅनडात जाणार आहेत. कॅनडानेच भारताला या परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. मात्र या परिषदेच्या निमित्ताने तेथील खलिस्तानी समर्थकांनी धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. पिवळे झेंडे लावलेल्या गाड्यांमधून हे खलिस्तान समर्थक रस्त्यांवर फिरत आहेत. त्या गाड्यांवर मोदींचा फोटो लावून त्याचा अपमानही केला जात आहे. आता तर या समर्थकांनी हद्दच ओलांडली आहे.
कॅनडामध्ये जी-७ संमेलन होण्यापूर्वी, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे, तिथे खलिस्तानी गटांनी भारतविरोधी आंदोलनात लहान मुलांचा वापर करून संतापजनक पद्धतीने प्रचार केला आहे. सामाजिक माध्यमांवर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, खलिस्तानवाद्यांनी लहान मुलांकडून भारतीय तिरंगा झेंड्याचा अपमान केला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटोला लाथा मारण्यासही या लहान मुलांना उद्युक्त केल्याचे दिसत आहे. एकूण ६ लहान मुले या प्रकारात सहभागी होती. मुलांना खलिस्तानी कार्यकर्त्यांनी फ्रेमबाहेरून नेमके काय करायचे त्याच्या सूचना दिल्या, हे स्पष्ट दिसत आहे.
बालमनांचा ‘ब्रेनवॉश’
विश्लेषकांच्या मते, खलिस्तानवादी आता कट्टर इस्लामी तत्त्वांची नक्कल करत आहेत. त्यातही अशा लहान मुलांचा, महिलांचा वापर राजकीय उद्देशांसाठी केला जातो.
मोदींना मारण्याची धमकीही
खलिस्तानी अतिरेकी मंजींदर सिंग याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यात तो थेट पंतप्रधान मोदींना ठार मारण्याची धमकी देतो. “हो, मी मोदींना घातपाताने ठार मारण्यास तयार आहे. नरेंद्र मोदी, हा कॅनडाचा शत्रू आहे,” असे त्याने एका पत्रकाराशी बोलताना सांगितले.
हे ही वाचा:
पाकिस्तानचे ‘उम्मा’ चुम्मा ना दे…
डेन्मार्कची बुरखाबंदी… भारतातील ‘पहले हिजाब’ म्हणणाऱ्यांसाठी धडा
एआय ३१५ फ्लाइट सुरक्षितपणे लँड
अहमदाबाद विमान अपघात : चौकशीत जागतिक तज्ज्ञांची सहभाग
शीख समाजाकडून तीव्र निषेध
मनजिंदर सिंग सिरसा (भा.ज.प. शीख नेते): “कॅनडात जे घडते आहे ते पाहून प्रत्येक शीखाला लाज वाटते आहे. मुलांना द्वेष शिकवून त्यांचा वापर करणे हे तालिबानी तंत्र आहे. ही गोष्ट शीख धर्माच्या शिकवणुकीच्या विरोधात आहे. गुरु ग्रंथ साहिबात मानवी सेवेची आणि संवादाची शिकवण आहे, द्वेषाची नाही.
मनिंदरजीत सिंग बिट्टा (ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंट अध्यक्ष): “संपूर्ण भारतीय शीख समाजाने यावर मौन बाळगणे दुर्दैवी आहे. पंतप्रधानांचा अपमान होत असताना आपण गप्प का?”
हरभजन सिंग (आप, खासदार): मुलं काय करत आहेत, हे त्यांना कळतही नाही. त्यामुळे मोठ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी मुलांना खरी गोष्ट समजावून सांगावी.
हरबन्स सिंग (तख्त श्री हरमंदिर साहिब सचिव): “पंतप्रधान मोदी आज जगासाठी नेतृत्वाचे उदाहरण देत आहेत. अशा प्रकारे त्यांचा अपमान खपवून घेतला जाऊ शकत नाही.”
सरदार त्रिलोचन सिंग (शीख विचारवंत): “ही मुलं दुसऱ्या देशातली आहेत, त्यांचं ब्रेनवॉश केलं जातंय. हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. कॅनडा सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.







