29 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरदेश दुनियाराज्यसेवा मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना यश

राज्यसेवा मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना यश

नवीन परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची आयोगाला विनंती

Google News Follow

Related

राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला असून या निर्णयामुळे सध्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता होती. आता मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, “राज्य सेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ पर्यायांवर आधारित परीक्षा घेतली जाते. या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करुन जुन्या पद्धतीनेच म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

हा निर्णय ह्यावर्षीपासूनच म्हणजे २०२३ पासून लागू केल्यास या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.”त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलण्याची आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करुन त्याप्रमाणे वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा निर्णय पुढे ढकलावा. आयोग यावर तातडीने निर्णय घेऊन राज्यातील लाखो तरुण-तरुणींना दिलासा देईल,” असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी आज व्यक्त केला आहे.

“महाराष्ट्र लोकसेवा आयोग अत्यंत कार्यक्षमतेने काम करीत असून गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये आयोगाने नोकऱ्यांमधील अनुशेष कमी करण्याचे काम वेगाने हाती घेतले आहे. शासकीय नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली असून त्याचे नियोजनही झालेले आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढे या पत्रात म्हटलं आहे.स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजल्या. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळात तातडीने परीक्षेबाबत निर्णय घेतला गेला आहे.

हे ही वाचा:

दिलासा..चारधाम यात्रेसाठी जोशीमठ सुरक्षित

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्या जगाचे लक्ष

…अदानींमुळे म्हणे LIC बुडाली!

काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी राज्य सेवेची तयारी करत असतात . या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात २०२३ पासून बदल करण्यात येत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. २०२५ पासून हा नियम लागू करण्यात यावा, यासाठी पुण्यात आज सकाळी विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन सुरु केले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, ही प्रमुख मागणी विद्यार्थ्यांची होती. ही मागणी मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा