29 C
Mumbai
Sunday, December 28, 2025
घरदेश दुनियाभारताची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा कोरोनाचे संकट

भारताची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा कोरोनाचे संकट

Google News Follow

Related

अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना विषाणूने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. भारतात दुसरी लाट जोरावर असताना न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रांनी भारतातील मृतदेहांचे फोटो दाखवून भारताला हिणवण्याचा प्रयत्न केला होता. काल मंगळवारी एकाच दिवसात अमेरिकेत कोरोनाचे १ लाखापेक्षा जास्त रुग्ण सापडले. त्यातच डिस्चार्जपेक्षा रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेसह जगासाठी पुन्हा हा धोका आहे. अमेरिकेत १,०६,०८४ नवे कोरोना रुग्ण आढळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या ७३ टक्क्यांनी वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत दोन डोस घेतलेल्यांनी मास्क लावण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा नियमांमध्ये बदल केले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.

दरम्यान, अमेरिकेतील फ्लोरिडा ३८,३२१ टेक्सास (८,६४२), कॅलिफोर्निया (७,७३१), लुईसियाना (६,८१८), जॉर्जिया (३,५८७), यूटाह (२,८८२), अलबामा (२,६६७), आणि मिसौरी (२,४१४) या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णवाढीची सरासरी ६२,४११ इतकी होती. तर मागील महिन्यातील ही आकडेवारी केवळ १२,६४८ इतकी होती. मात्र या आठवड्यात एकाच दिवसात १ लाखापेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे.

हे ही वाचा:

शी जिनपिंगची तिबेट भेट हा भारताला इशारा?

देशासाठी मेडल जिंकलं तरच आम्ही भारतीय ठरतो

मोदी सरकार कर्जबुडव्यांविरोधात उचलणार ‘हे’ कठोर पाऊल

अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर कालवश

दरम्यान, अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट हा लस घेतलेल्यांमध्येही आढळत आहे. हा नवा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. त्यामुळे मास्क बंधनकारक करण्यात येत आहे. हा व्हायरस अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा