26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरक्राईमनामादाऊद कराचीत; दाऊदच्या भाच्याने दिली कबुली

दाऊद कराचीत; दाऊदच्या भाच्याने दिली कबुली

Google News Follow

Related

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या चौकशीतून मोठा खुलासा झाला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच असल्याचे ईडीच्या चौकशीतून समोर आले आहे. ईडी सध्या मनी लाँडरिंग प्रकरणी तपास करत आहे. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

दाऊदचा भाचा आणि हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ईडीसमोर महत्त्वाची कबुली दिली आहे. या कबुलीमध्ये “दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराचीत आहे. मात्र, माझा दाऊदसोबत कोणताही संपर्क नाही. मात्र, दाऊदची बायको महजबीनने सणांच्या काळात माझ्या बायकोशी आणि बहिणीशी संपर्क केला होता.” अशी माहिती दिली आहे.

दाऊदचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अलिशाह यानेच ईडीला गोवावाला कंपाउंड व्यवहारची माहिती दिली. तसेच गोवावाला कंपाउंडशी संबंधित व्यवहार त्याची आई सलीम पटेल आणि इतर लोकांच्या मदतीने पाहत होती. मधल्या काळात हसीना पारकरने ही जमीन नवाब मलिकांना विकली नेमका व्यवहार किती रुपयात झाला ते माहिती नसल्याचे आलिशाहने सांगितले.

अलिशह ने असही सांगितलं की दाऊद भारत सोडून गेल्यानंतर इकबाल कासकर काही व्यवहार सांभाळत होता मात्र त्याला अटक झाली होती. हसीना पारकर प्रॉपर्टी डिस्प्युट तसेच उसने पैसे देणे आणि काही मालमत्तांच्या माध्यमातून येणाऱ्या भाड्यावर आमचे व्यवसाय अवलंबुन होते, अशी माहिती त्याने दिली. ईडीने नवाब मलिक यांच्या अटकेआधी अलिशाह पारकरची चौकशी केली होती.

हे ही वाचा:

‘यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा उजवा हात’

हे सरकार पाण्याचा शत्रू

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…

दरम्यान, काही राजकारण्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे केवळ आरोप करण्यात आले नाहीत, तर विशेष न्यायालयाने ईडीने सादर केलेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी मलिकांचे दाऊद कंपनीशी संबंध असल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे. दरम्यान, ईडीने पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या संबंधित लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि उपनगरात ईडीने दाऊदच्या संबंधित लोकांच्या घरांवर धाडी मारल्या होत्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा