व्हेनेझुएलामधील भूकंपातील मृतांचा आकडा ३,८८९ वर

मदत आणि बचावकार्य सुरूच

व्हेनेझुएलामधील भूकंपातील मृतांचा आकडा ३,८८९ वर

व्हेनेझुएला मध्ये झालेल्या भीषण भूकंपात मृत्यू झालेल्यांची संख्या ३,८८९ वर पोहोचली असून १६,७४० जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएला च्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रोड्रिगेज यांनी ही माहिती दिली. जॉर्ज रोड्रिगेज यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे देशातील १७,९०७ नागरिक बेघर झाले आहेत. सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ६,४६२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुख्य भूकंपानंतर व्हेनेझुएला मध्ये आतापर्यंत १,१४२ आफ्टरशॉक्स (पश्चातधक्के) नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, व्हेनेझुएला च्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेज यांनी नुकत्याच झालेल्या भूकंपातील पीडितांसाठी २८ देशांनी दिलेल्या मानवतावादी मदतीबद्दल आभार व्यक्त केले. कराकासमधील मदत साहित्य संकलन केंद्राला भेट दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. या केंद्रात २४ जूनच्या भूकंपग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा शिबिरांमध्ये वितरित करण्यासाठी २,००० टनांहून अधिक आंतरराष्ट्रीय मदत साहित्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन केले जात आहे.

डेल्सी रोड्रिगेज म्हणाल्या, “व्हेनेझुएला मदतीचा हात पुढे करणाऱ्या देशांचे, जगभरातील जनतेचे आणि सरकारांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. प्रत्येक देशाला त्याने दिलेल्या मदतीचा वापर कसा केला जात आहे, हे पाहता येईल. त्यामुळे व्हेनेझुएला तील जनतेला त्या देशांच्या मैत्रीपूर्ण सहकार्याची जाणीव होईल.” त्या पुढे म्हणाल्या, “या भीषण आपत्तीच्या काळात जगभरातून मिळालेल्या मदतीमुळे व्हेनेझुएला एकटा नाही, याची आम्हाला जाणीव झाली आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविष्यातील पुनर्बांधणी, जखमा भरून काढणे आणि प्रभावित भाग पुन्हा उभे करणे.”

हे ही वाचा:

देशभरात मान्सूनचा कहर; १० जणांचा मृत्यू

निदा खानला जामीन देताना श्रीकृष्णाचा उल्लेख, पण गुन्हा गंभीरच

ट्रम्प यांच्या हत्येचा कट? इस्रायलने अमेरिकेला दिला गुप्तचर अहवाल

तृणमूल सोडून भाजपमध्ये आलेल्या तीन खासदारांना राज्यसभेची उमेदवारी

यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत अहवालात १७,३४५ नागरिक बेघर झाल्याची माहिती देण्यात आली होती. प्रभावित आणि बेघर नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने अनेक तात्पुरती निवारा शिबिरेही उभारली आहेत. दरम्यान, कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेज यांनी गेल्या आठवड्यात २४ जून रोजी झालेल्या भीषण भूकंपातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशात सात दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा केली होती. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले होते, “या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या स्मरणार्थ आज सायंकाळी ६ वाजल्यापासून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे.”

Exit mobile version