मंगळवारी सकाळी रशियाच्या पूर्व किनारपट्टी भागात ८.७ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला, त्यानंतर पॅसिफिक महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला.
अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण (यूएसजीएस) नुसार, रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळ ८.७ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. गेल्या काही दशकांमधील हा सर्वात मोठा भूकंप आहे.
पुढील काही तासांत जपानच्या किनाऱ्यावर धोकादायक त्सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे. जपान सरकारनेही आपत्कालीन इशारा जारी केला आहे, त्सुनामी सल्ल्याचे इशाऱ्यात बदल केले आहे. सरकारने लोकांना तात्काळ किनारी भागातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेने अलास्कासह अनेक भागात त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे.







