30 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरदेश दुनियाहोर्मुझच्या सामुद्रधुनीत चार तेलवाहू जहाजांना आग

होर्मुझच्या सामुद्रधुनीत चार तेलवाहू जहाजांना आग

नौदलाच्या सुरुंगांना धडकून स्फोट झाल्याचा इराणचा दावा

Google News Follow

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीत चार तेलवाहू जहाजांना स्फोट होऊन आग लागल्याची घटना समोर आली आहे. या जहाजांची नौदलाच्या सुरुंगांशी धडक झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) नौदलाने केला आहे. मंगळवारी (२४ नोव्हेंबर) ही घटना घडली. या घटनांमुळे जगातील महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गावरील जहाजांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील प्रतिबंधित सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या एका तेलवाहू जहाजाला मंगळवारी पहाटे नौदलाच्या सुरुंगाची धडक बसली. त्यानंतर जहाजावर मोठा स्फोट होऊन आग लागली. याचदरम्यान, इराणच्या नौदलाने आणखी दोन तेलवाहू जहाजांना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सुरुंगांचा फटका बसल्याचे सांगितले. या जहाजांनी आपली ओळख आणि दिशादर्शक यंत्रणा बंद केली होती, असा आरोपही इराणने केला आहे. याशिवाय, यापूर्वी तीन जहाजांना अशाच प्रकारे आग लागल्याचा दावा आयआरजीसीने केला होता.

हे ही वाचा:

चीनच्या अंतराळ मोहिमेत पाकिस्तानी अंतराळवीराचा सहभाग

अमेरिकेचा भारतासह १६ देशांना टॅरिफचा इशारा

दिल्लीतील कॅफेमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

विक्रोळीत घरात घुसून अतिप्रसंग करू पाहणाऱ्या अनासला चोप

दरम्यान, स्फोट झालेल्या जहाजांची नावे, त्यावरील कर्मचाऱ्यांची संख्या, जीवितहानी आणि नुकसानीची माहिती इराणने जाहीर केलेली नाही. या घटनेनंतर इराणच्या नौदलाने अन्य दोन तेलवाहू जहाजांना रेडिओ संदेशाद्वारे इशारा दिला. त्यामुळे त्यांनी प्रवास थांबवून पर्शियन आखाताकडे माघार घेतल्याचे सांगण्यात आले. जगातील तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या मार्गावरील वाढत्या घटनांचा परिणाम आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक आणि ऊर्जा पुरवठ्यावर होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा