28 C
Mumbai
Wednesday, February 18, 2026
घरदेश दुनिया“फ्रान्स हा भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदार”

“फ्रान्स हा भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदार”

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला विश्वास

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कर्नाटकातील वेमगल येथे टाटा एअरबसच्या एच-१२५ लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरच्या फायनल असेंब्ली लाईनचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील लोकभवन येथे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा केली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत आणि फ्रान्स यांचे संबंध अत्यंत विशेष आहेत. फ्रान्स हा भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मिळून आम्ही या धोरणात्मक भागीदारीला अभूतपूर्व खोली आणि ऊर्जा दिली आहे. परस्पर विश्वास आणि सामायिक दृष्टीकोनाच्या आधारावर आज आम्ही या संबंधांना ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी’च्या स्तरावर नेत आहोत.

पंतप्रधानांनी नमूद केले की भारत- फ्रान्स संबंध खरोखरच अद्वितीय आहेत. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली या भागीदारीला नवी गतिशीलता आणि बळ मिळाले आहे. हा सहयोग केवळ रणनीतीपुरता मर्यादित नसून, सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत स्थैर्य आणि प्रगतीसाठी वचनबद्ध असलेली भागीदारी आहे. त्यांनी सांगितले की भारत आणि फ्रान्स मिळून माउंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत उड्डाण करू शकणारे जगातील एकमेव हेलिकॉप्टर भारतात तयार करतील आणि ते संपूर्ण जगभर निर्यात करतील, याचा आम्हाला अभिमान आहे.

हे ही वाचा:

इम्रान खान यांना योग्य वागणूक द्या!

इन्फोसिस, टीसीएस, एचसीएलटेकचे शेअर्स वाढले; आयटी शेअर्स वाढण्याचे काय आहे कारण?

इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो म्हणजे कल्पना आणि नवोपक्रमाचा शक्तिशाली संगम

आदित्य धर यांची B62 प्रॉडक्शन कंपनी ब्लॅकलिस्ट!

पंतप्रधान मोदी म्हणाले की २०२६ हे वर्ष भारत आणि युरोपमधील संबंधांसाठी महत्त्वाचे वळण ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने युरोपियन युनियनसोबत इतिहासातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करार केला आहे. हा करार भारत-फ्रान्स संबंधांनाही नवी गती देईल. ते पुढे म्हणाले की आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी इंडो-फ्रेंच सेंटर, डिजिटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी इंडो-फ्रेंच सेंटर आणि एरोनॉटिक्समधील कौशल्य विकासासाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहेत. हे उपक्रम भविष्य घडवणारे मंच ठरतील. पंतप्रधानांनी शेवटी म्हटले की आज जग अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. अशा परिस्थितीत भारत-फ्रान्स भागीदारी ही जागतिक स्थैर्यासाठी एक मजबूत आधारस्तंभ आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा