24 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरदेश दुनियाअब्जोपती सोरोसने भारताच्या लोकशाहीवर ओकली गरळ;  भारतीयांनी केले लक्ष्य

अब्जोपती सोरोसने भारताच्या लोकशाहीवर ओकली गरळ;  भारतीयांनी केले लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले लक्ष्य

Google News Follow

Related

भारताशी संबंधित विषयांमध्ये हस्तक्षेप करण्याची परदेशातील संस्था व व्यक्तींची वाईट खोड जाण्याची काही चिन्हे नाहीत. आता अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोसने अदानी प्रकरणात तोंड घालून स्वतःचे मूल्य वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याला भारतातून जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे.

गौतम अदानी यांच्याविरोधात हिंडेनबर्ग या कंपनीने तयार केलेल्या अहवालामुळे अदानी उद्योगसमुहाचे शेअर्स घसरले. त्यावरून सोरोसने म्हटले आहे की, अदानी प्रकरणामुळे भारतातील लोकशाहीचे पुनरुज्जीवन होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

त्यावरून भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी सोरोसवर टीका करत भारतीय लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. इराणी म्हणाल्या की, भारताने अशा परकीय शक्तींना वेळोवेळी धडा शिकविला आहे आणि आजही तसा धडा शिकवलाजाईल. मी प्रत्येक भारतीयाला आवाहन करते की, त्यांनी सोरोसला चोख उत्तर द्यावे.

हे ही वाचा:

अधिक युक्तिवादाची गरज .. सत्तासंघर्षांवर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी

गिरीश बापट यांच्यामुळे कसब्याचा गड मजबूत

राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पणदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

मेघालय नंतर आता काश्मीरला भूकंपाचे धक्के

काँग्रेसला सोरोसचे हे विधान आवडलेले नाही हे विशेष. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, जॉर्ज सोरोसचा याच्याशी काय संबंध आहे? अदानी प्रकरणामुळे भारतीय लोकशाहीवर काय परिणाम होतील अथवा नाही याच्याशी सोरोस यांचा संबंध नाही. तो काँग्रेस, विरोधी पक्ष, भारतातील निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे.

स्मृती इराणी यांनी म्हटले आहे की, जॉर्ज सोरोस हा आर्थिक घपलेबाज आहे. त्याने बँक ऑफ इंग्लंडला बुडवले. आता तो भारतीय लोकशाहीला बुडविण्याचा प्रयत्न करत आहे. इराणींनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, आपल्यावर टीका झाली तर आपण ती सहन करू पण भारतावर कुणी टीका केली तर आपण सहन करणार नाही. इराणी म्हणाल्या की, हे युद्ध आहे आणि यात टीका आणि परकीय शक्ती यांच्या दरम्यान एकच व्यक्ती उभी राहू शकते ती म्हणजे नरेंद्र मोदी.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा