25 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरदेश दुनियाकुशल भारतीयांसाठी जर्मनीची दारे खुली! भारतातील जर्मन राजदूत असे का म्हणाले?

कुशल भारतीयांसाठी जर्मनीची दारे खुली! भारतातील जर्मन राजदूत असे का म्हणाले?

राजदूत डॉ. फिलिप अकरमन यांचे कुशल भारतीय कामगारांना खुले आमंत्रण

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच मोठा निर्णय घेत एच- १ बी व्हिसा नियमांमध्ये बदल करत शुल्क वाढवले. याचा सर्वाधिक फटका हा भारतीयांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच जर्मनीने या संधीचा फायदा घेत भारतीयांना आवाहन केले आहे. कामगारांसाठी जर्मनीची दारे खुली असल्याचे म्हटले आहे. भारतातील जर्मन राजदूत डॉ. फिलिप अकरमन यांनी कुशल भारतीय कामगारांना खुले आमंत्रण दिले असून युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला अमेरिकेसमोर एक स्थिर आणि फायदेशीर पर्याय म्हणून सादर केले आहे.

सर्व उच्च कुशल भारतीयांना माझे आवाहन आहे की जर्मनी त्याच्या स्थिर स्थलांतर धोरणांमुळे आणि आयटी, व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांसाठी उत्तम नोकरीच्या संधींमुळे वेगळे आहे. जर्मनीमध्ये काम करणारा भारतीय सरासरी जर्मनपेक्षा जास्त कमावतो, असे त्यांनी म्हणत जर्मनी हा भारतीयांसाठी एक उत्तम पर्याय असल्याचे अधोरेखित केले आहे. आम्ही कठोर परिश्रम करण्यावर आणि सर्वोत्तम लोकांना सर्वोत्तम नोकऱ्या देण्यावर विश्वास ठेवतो, असे अकरमन यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प प्रशासनाने गेल्या आठवड्यात एच- १ बी व्हिसा शुल्क प्रति अर्ज १,००,००० डॉलर्सपर्यंत वाढवल्यामुळे खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या भारतीय तंत्रज्ञ आणि आउटसोर्सिंग कंपन्यांसाठी ही सुधारणा त्रासदायक आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन नियमांचा उद्देश हा अमेरिकन कामगारांना प्राधान्य देणे आहे.

हे ही वाचा..

स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून वेळ मिळाला की “हे” काम करा!

न्यू यॉर्कमध्ये मोबाईल नेटवर्क ठप्प करून संपर्क यंत्रणा बिघडवण्याचा कट उधळला

आप नेते सत्येंद्र कुमार जैन यांची ७.४४ कोटींची मालमत्ता जप्त

आसाममधून ३७ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले!

जर्मनीमध्ये वाढत असलेल्या लोकसंख्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अकरमन यांचे हे मत आहे. वृद्ध लोकसंख्येचे परिणाम भरून काढण्यासाठी जर्मन अर्थव्यवस्थेला २०४० पर्यंत दरवर्षी सुमारे २,८८,००० स्थलांतरितांची आवश्यकता असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी, बर्लिनने २०२४ मध्ये १० टक्क्यांहून अधिक व्यावसायिक व्हिसा जारी करण्याची योजना जाहीर केली आहे. गेल्या वर्षी, जर्मन सरकारने २०२५ मध्ये २००,००० व्यावसायिक व्हिसा जारी करण्याचे वचन दिले होते, त्यापैकी ९०,००० भारतीयांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. सुमारे १,३०,००० भारतीय व्यावसायिक आधीच जर्मनीमध्ये राहतात आणि काम करतात, ज्यांचे उत्पन्न स्थानिक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. २०२३ च्या अखेरीस, पूर्णवेळ जर्मन कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार दरमहा ३,९४५ युरो होता. सरकारी आकडेवारीनुसार, भारतीय वंशाच्या व्यावसायिकांना सरासरी ५,३५९ युरो मिळत होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा