उत्तर नायजेरियातील कटसीना येथे सशस्त्र गुंडानी नमाजच्या वेळेत एका मशिदीवर केलेल्या हल्ल्यात किमान 27 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत, अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अहवालानुसार, स्थानिक रहिवाशांनी सांगितले की मालुमफशी भागातील दूरस्थ उंगुवान मंतौ गावात बंदूकधाऱ्यांनी मुस्लीम लोक नमाजासाठी एकत्र आले असताना मशिदीत गोळीबार सुरू केला.
सद्यःस्थितीत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, नायजेरियाच्या उत्तर-पश्चिम आणि उत्तर-मध्य भागांमध्ये असे हल्ले सामान्य झाले आहेत, जिथे स्थानिक मेंढपाळ आणि शेतकरी यांच्यात पाणी आणि जमिनीच्या वादावरून अनेकदा संघर्ष होत असतो.या हल्ल्यांमध्ये अनेक जण मारले गेले आहेत आणि बरेच जण गंभीर जखमी झाले आहेत.
राज्याचे आयुक्त नासिर मुअज़ू यांनी सांगितले की, मंगळवारी झालेल्या रक्तपातानंतर पुढील हल्ले रोखण्यासाठी उंगुवान मंतौ भागात लष्कर आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, पावसाळ्यात हे सशस्त्र हल्लेखोर अनेकदा पिकांमध्ये लपून बसतात आणि नंतर समुदायांवर अचानक हल्ला करतात.







