26 C
Mumbai
Thursday, January 1, 2026
घरदेश दुनियाहैतीला आधी भूकंपाचा झटका आणि आता ‘ग्रेस’ची भीती

हैतीला आधी भूकंपाचा झटका आणि आता ‘ग्रेस’ची भीती

Google News Follow

Related

हैतीच्या संकटात आता अजून भर पडणार आहे ती म्हणजे ‘ग्रेस’ या वादळाची. भूकंपाच्या धक्क्यातून अजून न सावरलेल्या या देशाला सोमवारी मध्यरात्री किंवा मंगळावरी पाहटेपर्यंत हे वादळ धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

हैतीच्या दक्षिण- पश्चिम भागाला शनिवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली आहे. पहिले कोरोना, नंतर राष्ट्राध्यक्षांची हत्या आणि आता भूकंप अशा संकटाना हा देश सामोरे जात आहे. या देशात ७.२ रिश्टर क्षमतेचा भूकंपाची नोंद झाली असून शेकडो बांधकामे जमीनदोस्त झाली आहेत.

शनिवारी भूकंपाचे हादरे बसताच कॅरिबियन बेटावरील लोक आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावले. भूकंपासोबतच ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. आपत्तीमधून बचावलेल्या लोकांनी कोसळलेली घरे, हॉटेल आणि अन्य बांधकामांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावपथकांना मदत केली. या दुर्घटनेत किमान ७२४ लोक ठार झाले तर १८०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हे ही वाचा:

ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंनी घेतला मोदींसोबत आईस्क्रिमचा आस्वाद

‘या’ विमा कंपनीचे होणार खासगीकरण

अफगाणिस्तानच्या पतनाला कोण जबाबदार?

लोकल प्रवासासाठी ‘या’ लसीला अधिक मागणी

या भूकंपात ८६० घरे नष्ट झाली आहे तर ७०० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे, असे हैतीच्या नागरिक सुरक्षा यंत्रणेचे संचालक जेरी चांडलर यांनी सांगितले. या भूकंपाचे केंद्र हैतीचे राजधानीचे शहर असलेले पोर्ट औ प्रिन्स या शहराच्या पश्चिमेला १२५ किलोमीटरवर असल्याचे अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने सांगितले.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत भूकंपाचे धक्के बसत असल्यामुळे बेघर झालेल्या नागरिकांनी आणि ज्यांची घरे मोडकळीस आली आहेत अशा सर्वांनी रात्र रस्त्यावरच काढली. किनारपट्टीजवळील लेस कायेस या शहराला भूकंपाचा धक्का जोरदार बसला असून नुकसान अधिक झाले आहे. उध्वस्त झालेल्या भागांमध्ये तातडीने मदत पाठवली जात असल्याचे हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा