30 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरदेश दुनियाभारताविरुद्ध पाकला ड्रोन पुरविणाऱ्या तुर्कीचे सफरचंद आम्हाला नको!

भारताविरुद्ध पाकला ड्रोन पुरविणाऱ्या तुर्कीचे सफरचंद आम्हाला नको!

पाकिस्तानच्या मदतीमुळे बागवान नाराज, हिमाचलमधून वाढली मागणी  

Google News Follow

Related

भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली असून सध्या दोनही बाजूने शांतता आहे. या तणावाच्या काळात जगभरातील बलाढ्य देश भारताच्या पाठीशी होते तर पाकिस्तानसोबत तुर्की आणि चीन उभा होता. चीन एका बाजूने आपला शत्रू म्हणायला काही हरकत नाही कारण त्याने प्रत्येकवेळी भारताविरोधी भूमिका घेतली आहे. अशातच तुर्की देखील पाकिस्तानच्या पाठीशी असल्याचे समोर आले. तुर्कीने पाकिस्तानला केलेल्या मदतीमुळे हिमाचल प्रदेशातील बागायतदार नाराज आहेत. तुर्कीमधून येणाऱ्या सफरचंदांसह सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी  केंद्र सरकारकडे केली आहे.

हिमाचल प्रदेश फ्लॉवर, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष हरीश चौहान म्हणाले, तुर्कीमधून देशात मोठ्या प्रमाणात सफरचंद आयात केले जातात. याचा परिणाम हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादकांच्या उत्पन्नावर होत आहे. याचा अर्थ असा की, देशातील बाजारपेठेत तुर्की सफरचंद उपलब्ध असल्याने हिमाचल प्रदेशातील सफरचंदांना वाजवी भाव मिळत नाही.
ते पुढे म्हणाले, पाकिस्तानला पाठिंबा देऊन तुर्कीने भारताचा विश्वासघात केला आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्याशी झालेल्या व्यापार करारांचा आढावा घेतला पाहिजे आणि तेथून सफरचंदांसह इतर वस्तूंच्या आयातीवर तात्काळ बंदी घातली पाहिजे.

हे ही वाचा : 

मला अभिमान आहे, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन!

पंतप्रधान मोदींनी ठणकावले; आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच!

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा! 

भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीबाबत बांगलादेशाचे विधान, काय म्हणाले युनुस!

त्याचप्रमाणे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार कुलदीप सिंह राठोड म्हणाले की, भारताने तुर्कीमधून सफरचंद आणि इतर वस्तूंच्या आयातीवर तात्काळ बंदी घालावी. या कृतघ्न देशाला धडा शिकवण्यासाठी आपल्या देशवासीयांनी पर्यटन आणि त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकावा.

राठोड पुढे म्हणाले, जेव्हा तुर्कस्तानमध्ये विनाशकारी भूकंप झाला तेव्हा भारताने एनडीआरएफ आणि मदत पाठवली होती. अशा प्रकारची मदत पाठवून भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ सुरू केले. भारताने ढिगाऱ्यात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी ‘गरुड एरोस्पेस ड्रोन’ पाठवले आणि ‘औषधे’ आणि अन्न वाहून नेण्यासाठी सुधारित ‘किसान ड्रोन’ पाठवले होते.
आता त्याच कृतघ्न देशाने ऑपरेशन दोस्तसाठी भारताचे आभार मानण्याऐवजी त्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. संकटाच्या वेळी मदत मागणाऱ्या तुर्कीने पाकिस्तानला लष्करी मदत पुरविली. त्यामुळे केंद्र सरकारने तुर्कीसोबतच्या व्यापारी संबंधांचा तात्काळ आढावा घ्यावा आणि देशातील जनतेला तुर्की वस्तू आणि पर्यटनावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी केले.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा