भारताचे S-400 अर्थात ‘सुदर्शन चक्र’ कसे पाकिस्तानसाठी ठरले मारक

पाकिस्तानचे आक्रमण केले निष्प्रभ

भारताचे S-400 अर्थात ‘सुदर्शन चक्र’ कसे पाकिस्तानसाठी ठरले मारक
भारतीय वायुदलाने बुधवारी रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेला हवाई हल्ला आपल्या S-400 संरक्षण प्रणालीच्या मदतीने थोपवला, असे संरक्षण क्षेत्रातील स्रोतांनी गुरुवारी सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने उत्तरेकडील व पश्चिमेकडील भारतातील लष्करी ठिकाणांवर हल्ले केले होते. भारताने S-400 प्रणाली, ज्याला “सुदर्शन चक्र” म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या मदतीने हे हल्ले रोखण्यात आले. भारताने प्रत्युत्तरादाखल लाहोरजवळील पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणालींवर हल्ला केला.

 

 

 

Exit mobile version