नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांवर विनयभंग, लैंगिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रकरण उघड झाले आहे. यामुळे खळबळ उडाली असून महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. सहा आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटीची (विशेष तपास पथक) स्थापना करण्यात आली आहे. लव्ह जिहाद पाठोपाठ हा नवा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत केला जात आहे.
नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या एका मल्टिनॅशनल कंपनीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कंपनीतल्या एचआर मॅनेजरकडून धर्मांतरासाठी जबरदस्तीसाठी केली जात होती. नमाज पठण करायला लावणं, मांसाहारी जेवण खायला लावणं, हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह शब्दात बोलणं, मुलींना लज्जास्पद वागणूक देणं, मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं असे संतापजनक प्रकार या कंपनीत सुरू होते. यापैकी पीडित महिला १८ ते २६ वयोगटातल्या असून २०२२ पासून असे प्रकार कंपनीत सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा, विनयभंगाचे, धार्मिक भावना दुखावत विनयभंगाचे असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी एकूण नऊ तक्रारदारांनी तक्रार केली आहे. त्यापैकी आठ महिला तर एक पुरुष तक्रारदार आहे. आरोपीने बळजबरीनं धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बळजबरी धर्मांतर केलेल्या संबंधित तरुणाचे संशयित आरोपीसोबतचे डोक्यावर गोल टोपी घातलेले फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हा प्रकार २५ मार्च २०२६ ला उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुप्त तपास सुरू केला होता.
जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान दानिश शेख, तौसिफ अख्तार, निदा खाननं कर्मचारी महिलेच्या धार्मिक भावना दुखावल्या. तौसिफने धमकावून शारीरिक संबंध ठेवले. इतरांनी ऑफिस लॉबीमध्ये विनयभंग केला. मे २०२३ ते १९ मार्च २०२६ या काळात रझा मेमन, शाहरुख कुरेशीने ऑफिसमध्ये विनयभंग केला. कंपनीच्या एचआर विभागाकडे याची तक्रार करण्यात आली. पण एचआर अधिकाऱ्यांनीही या दोघांच्या कृत्याला पाठींबा दिला. शफी शेखने ऑफिसच्या मीटिंगमध्ये एकटक पाहून पीडितेच्या वैयक्तिक आयुष्यात संतती नसल्याबद्दल विधान केलं आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मे ते डिसेंबर २०२५ मध्ये तौसिफने तरुणीच्या तिच्या खासगी आयुष्याबद्दल गोष्टी विचारल्या आणि इतर युवतींना धर्माबाबत बोलून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या.
हे ही वाचा:
पुडुचेरी निवडणुक: साडीतल्या ‘नीला’ रोबोटकडून मतदारांचे स्वागत
इस्रायलकडून हिजबुल्लाह प्रमुखाच्या सचिवाचा खात्मा
पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्री कतार दौऱ्यावर
पश्चिम बंगाल निवडणूकीदरम्यान सुरक्षेसाठी केंद्रीय दल तैनातीची मागणी
तौसिफ अख्तार, दानिश शेख आणि रझा मेमन यांनी तरुणाला त्याच्या धर्मातील देवाबद्दल अपशब्द बोलून विशिष्ट धर्माचे धार्मिक विधी करायला सांगितले. जबरदस्तीनं मांसाहार करायला लावला. त्याच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला आणि त्याच्या धर्मातल्या महिलांबाबत अश्लील शेरेबाजी केली. गुन्हा सहानुसार, आसिफ अन्सारी आणि शफी शेख या संशयितांनी युवतीचा विनयभंग केला.
दरम्यान, नाशिकमधल्या या आयटी कंपनीतल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात पीडित महिलांची संख्या मोठी असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. सर्व खासगी संस्थांना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. आणखी पीडित महिलांच्या तक्रारीसाठी पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी 9123232311 तसेच कंट्रोल रूम 112 वर संपर्क करता येणार आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. भोंदू बाबा अशोक खरात नंतर नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीतील आणखी महिलांचे लैंगिक शोषणाचा प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांची सुरक्षा आणि कामकाजाच्या वातावरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.







