29 C
Mumbai
Monday, March 2, 2026
घरदेश दुनियाइराणचे सर्वोच्च नेते खामेनी लपले बंकरमध्ये!

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी लपले बंकरमध्ये!

दोनही बाजूने हल्ले सुरूच 

Google News Follow

Related

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे त्यांचे घर सोडून एका बंकरमध्ये राहत आहेत. इस्रायलकडून सतत होणाऱ्या हवाई हल्ल्यांमुळे इराणी सैन्याने खामेनी यांना ईशान्य तेहरानमधील एका भूमिगत बंकरमध्ये नेले आहे. खामेनी आणि त्यांच्या कुटुंबालाही त्याच बंकरमध्ये ठेवण्यात आले आहे. शुक्रवारपासून इस्रायल इराणच्या प्रमुख शहरांमध्ये हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये विशेषतः इराणच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला लक्ष्य करण्यात आले आहे. इराणला भीती आहे की इस्रायल खामेनींवरही हल्ला करू शकते. अशा परिस्थितीत, देशाच्या सैन्याने आणि सुरक्षा संस्थांनी सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेसाठी त्यांना एका बंकरमध्ये हलवले आहे.

इराण इंटरनॅशनलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि त्यांचे कुटुंब तेहरानजवळील एका भूमिगत बंकरमध्ये आहेत. या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की खामेनी यांचे पुत्र मुज्तबा आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील बंकरमध्ये आहेत. या बंकरभोवती कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

इस्रायलने इराणवर हल्ला करून इराणी लष्करप्रमुख आणि आयआरजीसी कमांडर यांना ठार मारले आहे. इस्रायली हल्ल्यात किमान ९ इराणी अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने धमकी दिली आहे की अली खमेनी देखील सुरक्षित नाहीत. यामुळे इराणमध्ये खमेनींच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

हे ही वाचा : 

इराणमध्ये दहा हजारांहून अधिक अडकलेल्या भारतीयांना भूमार्गाद्वारे बाहेर पडण्याची मिळाली परवानगी!

एआय ३१५ फ्लाइट सुरक्षितपणे लँड

इराणी हल्ल्यांमध्ये इस्रायलमधील अमेरिकन दूतावासाचे नुकसान

दिल्लीमध्ये ३६ बांग्लादेशी नागरिक पकडले

दरम्यान, इस्रायल आणि इराणमध्ये रात्रीच्या वेळी नवीन क्षेपणास्त्र हल्ले झाले, ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. इराणने दावा केला की प्रमुख जनरल मारले गेले आहेत, तर इस्रायलने सांगितले की शुक्रवारपासून २७० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. तेहरानमधून अनेक लोक बाहेर पडत आहेत. इराणी आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, शुक्रवारी इस्रायली हल्ल्याला सुरुवात झाल्यापासून मृतांची संख्या २२४ वर पोहोचली आहे, तर १,२७७ जण जखमी झाले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा