31 C
Mumbai
Sunday, February 1, 2026
घरदेश दुनिया“भारताला दहशतवाद पुरस्कृत देशाकडून धडा घेण्याची गरज नाही”

“भारताला दहशतवाद पुरस्कृत देशाकडून धडा घेण्याची गरज नाही”

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारतीय राजदूत क्षितिज त्यागी यांनी पाकला सुनावले

Google News Follow

Related

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानवर टीका करताना भारतीय राजदूत क्षितिज त्यागी यांनी तीव्र शब्दात म्हटले की, खोटेपणा पसरवण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा नेहमीचा गैरवापर करत आला आहे. भारताला दहशतवादी पुरस्कृत देशाकडून धडा घेण्याची काहीही गरज नाही. अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्याकडून उपदेशाची गरज नाही, असे खडेबोल त्यांनी सुनावले आहेत.

क्षितीज त्यागी म्हणाले की, आम्हाला एका अशा देशाकडून चिथावणी देण्यास भाग पाडले जात आहे ज्याच्या स्वतःच्या नेतृत्वाने अलीकडेच त्यांची तुलना “डंप ट्रक” शी केली आहे. कदाचित अशा देशासाठी ही तुलना अनवधानाने योग्य असेल कारण या प्रतिष्ठित परिषदेसमोर खोटेपणा मांडून जमा करत राहतो, असा सणसणीत टोला त्यांनी पाकिस्तानला लगावला आहे. पाकिस्तानने भारताबाबत केलेल्या भाष्यांनंतर मानवाधिकार परिषदेच्या ६० व्या सत्रात त्यागी यांनी भारताचा उत्तर देण्याचा अधिकार वापरून आपले मत मांडले.

क्षितीज त्यागी यांनी यावेळी पहलगाममधील हल्ल्याची आठवण करत म्हटले की, ९/११ विसरू नये, कारण आज आपण या हल्ल्याच्या सूत्रधाराला आश्रय देणाऱ्या आणि त्याला शहीद म्हणून गौरवणाऱ्यांचा ढोंगीपणा पाहत आहोत. याशिवाय आपण पुलवामा, उरी, पठाणकोट, मुंबईवरील हल्ले विसरू नयेत. ही यादी अंतहीन आहे, असेही ते पुढे म्हणाले. त्यागी म्हणाले की, एवढे असूनही पाकिस्तान आज त्यांची बाजू मांडण्याचे धाडस दाखवत आहे. नैतिक संतापाचे ढोंग करत आहे आणि जागतिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या नेटवर्कना निधी आणि आश्रय देत आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय या नाटकाला ओळखतो, असा शाब्दिक हल्ला त्यांनी केला.

जग आणि भारत विसरणार नाही असे म्हणत ते पुढे म्हणाले की, आपल्याला दहशतवाद पुरस्कृत देशाकडून धडा घेण्याची गरज नाही; अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्याकडून उपदेशांची गरज नाही; स्वतःची विश्वासार्हता गमावणाऱ्या राज्याकडून सल्ला घेण्याची गरज नाही. त्यांनी पुढे म्हटले की, भारत आपल्या नागरिकांचे निर्धाराने संरक्षण करत राहील आणि कोणतीही तडजोड न करता आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करेल. आम्ही वेळोवेळी, एका अपयशी राज्याच्या फसवणुकीचा पर्दाफाश करत राहू ज्याचे अस्तित्व दहशतवादावर अवलंबून आहे, असे क्षितीज त्यागी म्हणाले.

हे ही वाचा : 

काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा प्रताप अंगरक्षकाला चापट; शिवीगाळ |

…म्हणून नेपाळ ढेपाळला! |

राधाकृष्णनच; ‘इंडी आघाडी’ गार, एनडीए ४५० पार |

वैयक्तिक किंमत चुकवण्याची वेळ आली आहे का?

स्वित्झर्लंडवरही जोरदार टीका

भारतीय राजदूतांनी स्वित्झर्लंडवरही जोरदार टीका केली. त्यांच्या टिप्पण्या या आश्चर्यकारक, उथळ आणि अज्ञान दर्शवणाऱ्या आहेत असे म्हणत त्यांनी निषेध केला. स्वित्झर्लंडने भारताला अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यमांचे रक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात असे आवाहन केल्यानंतर ही तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली. UNHRC चे सध्याचे अध्यक्ष म्हणून, स्वित्झर्लंडने खोटे आणि भारताचे वास्तव चुकीचे सादर करणाऱ्या कथनांनी परिषदेचा वेळ वाया घालवणे टाळले पाहिजे, असा टोला त्यागी यांनी लगावला.

क्षितीज त्यागी यांनी स्वित्झर्लंडला वंशवाद, भेदभाव आणि द्वेष यासारख्या समस्यांवर प्रकाश टाकून स्वतःच्या देशांतर्गत समस्या सोडवण्याचे आवाहन केले. तसेच भारत हा जगातील सर्वात मोठा वैविध्यपूर्ण परंपरा असलेला देश स्वित्झर्लंडला त्यांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत करण्यास तयार आहे, असे त्यांनी सुनावले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा