भारताचा कॅनडाला दणका; व्हिसा सेवा स्थगित

वादाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचा निर्णय

भारताचा कॅनडाला दणका; व्हिसा सेवा स्थगित

Canada India High Resolution Sign Flags Concept

खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर कॅनडाने भारतावर निरर्थक आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, आता भारताने कॅनडाला जबरदस्त दणका दिला आहे. भारताने कॅनडातील व्हिसा सेवा बंद केली आहे. यासंबंधी कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या व्हिसा सुविधा वेबसाईटवर घोषणा करण्यात आली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे काही दिवसांपासून भारतावर आरोप करत आहेत. यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने व्हिसा सेवा बंद करत कॅनडाला जशास तसे उत्तर दिले आहे. दरम्यान, कॅनडाने एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती. यावार उत्तर म्हणून भारताने मंगळवारी एका वरिष्ठ कॅनडा राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती.

भारत सरकारने कॅनडातील भारताची व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली असून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा स्थगित असेल, असं कॅनडातील व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे. भारतातून कॅनडामध्ये जाणाऱ्या व कॅनडातून भारतात येणाऱ्या असंख्य भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांना देश सोडण्याची धमकी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली असून कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी बुधवार, २० सप्टेंबर रोजी एक नियमावली जाहीर केली आहे.

हे ही वाचा:

हे आहेत कॅनडाशी संबंधित दहशतवादी !

अहमदनगरमध्ये तिहेरी हत्याकांड; जावयाकडून पत्नी, मेव्हणा, आजे सासूची हत्या

मुस्लिम महिलांना आरक्षणात स्थान नसल्यामुळे विधेयकाला ओवैसींचा विरोध !

लष्करी अधिकारी-जवनांमध्ये फूट पाडू नका!

कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या माफ केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार लक्षात घेता, तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि तिथे अंतर्गत प्रवास करु इच्छिणाऱ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तसेच कॅनडामधील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयात किंवा टोरंटो आणि व्हँकुव्हर येथील भारतीय महावाणिज्य दूतावासात नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीमुळे उच्चायुक्तालय आणि महावाणिज्य दूतावास कोणत्याही आपत्कालीन किंवा अप्रिय घटनेच्या वेळी कॅनडामधील भारतीय नागरिकांशी संपर्क साधू शकतील, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version