23.4 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरदेश दुनियाअरिजितची हॅट्ट्रिक, कोरियाला नमवून भारताची विजयी सलामी

अरिजितची हॅट्ट्रिक, कोरियाला नमवून भारताची विजयी सलामी

ज्युनियर वर्ल्डकप हॉकी स्पर्धा

Google News Follow

Related

अरिजित सिंह हुंदलने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने ज्युनियर वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत कोरियावर ४-२ असा विजय मिळवला आणि स्पर्धेचा यशस्वी श्रीगणेशा केला. बुकीत जलील स्टेडियमवर झालेल्या भारताच्या या सलामीच्या सामन्यात भारताने ही दमदार कामगिरी केली. अरिजितने ११, १६ आणि ४१ व्या मिनिटाला तर अमनदीपने ३०व्या मिनिटाला गोल केले. कोरियातर्फे दोह्युन लिम याने ३८व्या तर किमने ४५ व्या मिनिटाला गोल केला.

या सामन्याची सुरुवात संथ झाली. दोन्ही संघांनी हळूहळू एकमेकांवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. भारताने कोरियाचा बचाव भेदण्याचा प्रयत्न अगदी सुरुवातीला केला पण चेंडू गोलपोस्टवरून निघून गेला. ११ व्या मिनिटाला मात्र भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि अरिजितने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. भारताला १-० आघाडी मिळाली.

आत्मविश्वास उंचावलेल्या भारताने दुसऱ्या क्वार्टरच्या पहिल्याच मिनिटाला आणखी एक गोल केला. अरिजितने फिल्ड गोल करत भारताला २-० आघाडी मिळवून दिली. भारताने मग सामन्यावर मिळविलेली पकड अधिक घट्ट केली. तरीही कोरियाला २९व्या मिनिटाला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्याचे गोलमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. मात्र पुढच्याच मिनिटाला भआरताच्या अमनदीपरने मैदानी गोल करत भारताला ३-० अशी मोठी आघाडी मिळवून दिली.

हे ही वाचा:

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेच्या मृत्यूनंतर त्याचा साथीदार परमजीत सिंग उर्फ ​​धाडीला अटक!

उद्धव ठाकरे म्हणतात, लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या…

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांना गोळ्या घातल्या

थायलंडमध्ये बस अपघातात १४ जण ठार, २० जखमी!

तिसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियाने आपले खाते उघडले. ३८व्या मिनिटाला डोह्युनने पेनल्टी कॉर्नरच्या सहाय्याने गोल केला. पण भारताला त्यामुळे फार काही फरक पडला नाही. आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाने ४१व्या मिनिटाला आणखी गोल डागत ४-१ अशी विजयी आघाडी घेतली. हा गोलही अरिजितने केला. तिसऱ्या क्वार्टरमधील तीन मिनिटे शिल्लक असताना भारताकडे ९ खेळाडू शिल्लक राहिले होते. त्याचा फायदा कोरियाने उठविला आणि पेनल्टी कॉर्नरवर गोल करत पिछाडी २-४ अशी भरून काढली.

आता भारताची पुढील लढत स्पेनशी होणार आहे. गुरुवारी ही लढत होईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा