31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरदेश दुनियाअडकलेल्या विद्यार्थ्यांना सूचना गाड्यांवर तिरंगा लावा

अडकलेल्या विद्यार्थ्यांना सूचना गाड्यांवर तिरंगा लावा

Google News Follow

Related

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. या नागरिकांना, विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात येणार आहे. या संदर्भात यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे.

जे विद्यार्थी सीमा भागाजवळ राहतात त्यांना सर्वप्रथम भारतात येण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार  आहे. तसेच विद्यार्थ्यांनी बाहेर पडताना आपल्या कॉन्ट्रॅक्टरसोबत संपर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सीमा भागाकडे येताना पासपोर्ट, रोख (अमेरीकी डॉलर) आणि इतर गरजेच्या वस्तू सोबत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रवास करण्यासाठी बाहेर पडताना वाहनावर भारताचा झेंडा लावावा अशी महत्त्वाची सूचना भारतीयांना देण्यात आलीआहे. कोरोनाच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र देखील बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

युक्रेनमध्ये तब्बल २० हजार भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तेथील परिस्थिती आता युद्धामुळे अधिक चिघळली असून भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. युद्धामुळे युक्रेनमधील हवाई सीमा बंद आहेत, त्यामुळे भारतीयांना आणण्यासाठी इतर मार्गांचा विचार केला जात आहे.

हे ही वाचा:

खलिस्तानला विरोध केल्याबद्दल कॅनडामध्ये भारतीय रेडिओ होस्टवर हल्ला…

अमेरिका आपले सैन्य युक्रेनमध्ये पाठवणार नाही!

नवाब मालिकांची प्रकृती खालावल्याने केले रुग्णालयात दाखल…

लुडो खेळण्यावरून दोन प्रवाशांमध्ये लोकलमध्ये हाणामारी…

रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विमान युक्रेनमध्ये गेले होते. मात्र, युद्धामुळे युक्रेन विमानतळ बंद करण्यात आले आणि हे विमान रिकामीच माघारी परतले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा