28 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरदेश दुनियानाइटक्लबने प्रवेश न दिल्याने भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा गारठून मृत्यू

नाइटक्लबने प्रवेश न दिल्याने भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा गारठून मृत्यू

Google News Follow

Related

२० जानेवारी रोजी अकुल धवन या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या इलिनॉइस विद्यापीठ परिसराजवळ आढळला होता. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण महिनाभरानंतर समोर आले आहे. त्याला जवळच्या नाइटक्लबने प्रवेश नाकारल्यामुळे हायपोथेर्मिया होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विद्यापीठ संकुल परिसरातील पोलिसांनी याबाबतची माहिती दिली.

अकुल हा मित्रांसोबत संध्याकाळी मद्यपान करत होता. मात्र रात्री साडेअकरा वाजता परिस्थितीच बदलली. अकुलचे मित्र कॅम्पसजवळच्या कॅनपॉय क्लबमध्ये गेले होते. तेथे ते रात्रभर होते. मात्र कर्मचाऱ्यांनी अकुल याला प्रवेश नाकारला, असे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याबाबतचे दृश्य कैद झाले आहे. ‘तो सातत्याने क्लबमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली. अकुलने त्याने बोलावलेले दोन राइड शेअरही नाकारले, असे पोलिसांनी सांगितले.

अकुलचा ज्यावेळी मृत्यू झाला, तेव्हा तापमान उणे २.७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. संपूर्ण रात्रभर अकुलचे मित्र त्याला फोन करत होते, मात्र त्याने ते उचलले नाहीत. काळजीत पडलेल्या त्याच्या मित्रांनी त्यानंतर कॅम्पसमधील पोलिसांना त्याचा शोध घेण्याची विनंती केली. पोलिसांनी त्याचा कॅम्पसपर्यंतच्या मार्गापर्यंत शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. ‘आम्हाला सारखे विचारले जात आहे की, अकुल बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतरही तो तुम्हाला १० तासांनंतर का सापडला? तो लगेच सापडला असता तर त्याला वाचवता आले असते. तो जिथून बेपत्ता झाला आणि तो जिथे सापडला यामध्ये २०० फूटांचे अंतर आहे,’ असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

शरद पवार यांच्या गटाला ‘तुतारीवाला माणसा’चे चिन्ह

मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

कोलकत्ता उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले

शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू

अकुलचे आईवडील इश आणि रितू धवन हे कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को येथे राहतात. पोलिस त्यांच्या मुलाला शोधू न शकल्याने अकुलच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. हिवाळी सुटीनंतर कॉलेजला परतल्यानंतर एका महिन्यातच अकुलचा मृत्यू झाला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा