29.5 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरदेश दुनियामालदीवमधून १० मेपर्यंत भारतीय सैनिक मायदेशी परतणार

मालदीवमधून १० मेपर्यंत भारतीय सैनिक मायदेशी परतणार

दोन्ही देशांमध्ये एकमत

Google News Follow

मालदीवमधून भारतीय सैनिक लवकरच मायदेशी परतणार आहेत. याचा पहिला टप्पा १०मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत शुक्रवारी माहिती दिली. या बाबत भारत आणि मालदीवदरम्यान उच्चस्तरीय बैठक झाल्यानंतर काही तासांतच हा निर्णय जाहीर झाला आहे. दोन्ही देशांची उच्चस्तरीय बैठक दिल्लीत झाली. त्यात मुख्यत्वे मालदीवमधून भारतीय सैनिकांना मायदेशी बोलावण्याबाबत चर्चा झाली.

मालदीवमध्ये भारतीय विमान प्लॅटफॉर्मचे संचालन सुरू ठेवण्याच्या काही मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली. गेल्या महिन्यात मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी भारताने १५ मार्चपर्यंत त्यांच्या सर्व सैनिकांना माघारी बोलवावे, असे सांगितले होते. मालदीवच्या नागरिकांना मानवतावादी मदत आणि वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असलेली विमानसेवा सुरूच ठेवण्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले. याबाबत पुढील बैठक मालेमध्ये होईल. १० मेपर्यंत सर्व सैनिक माघारी परततील, असे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेना नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार

दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय

दिवाळखोर पाकिस्तान आता मालदीवला मदत करणार!

मशीद कमिटीची याचिका फेटाळली, ज्ञानवापीत पूजा सुरूच राहणार!

सद्य परिस्थितीत मालदीवमध्ये सुमारे ८० भारतीय सैनिक आहेत. जे मुख्यतः दोन हेलिकॉप्टर आणि एका विमानाचे संचालन करण्याच्या मोहिमेवर आहेत. त्यांच्या मदतीने शेकडो नागरिकांना वैद्यकीय मदत आणि मानवतावादी मदत करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुइज्जू सत्तेत आल्यानंतर भारत आणि मालदीवमध्ये तणाव वाढला आहे. चीनचे समर्थक मानल्या जाणाऱ्या मुइज्जू यांनी निवडणुकीत मालदीवच्या भूमिवरून भारतीय सैनिकांना हटवले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्ती आपण करत असल्याचे मुइज्जू यांचे म्हणणे आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा