25 C
Mumbai
Sunday, January 4, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेत घुसखोरांना स्थान नाही; ट्रम्प यांच्याकडून मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी

अमेरिकेत घुसखोरांना स्थान नाही; ट्रम्प यांच्याकडून मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी

नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच निर्णयांचा धडाका

Google News Follow

Related

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच मोठमोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. अध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेचा सुवर्णकाळ आतापासून सुरू होत असल्याचे सांगत इमिग्रेशन, ऊर्जा, लष्करी आणि फेडरल वर्कफोर्स यासह त्यांच्या प्रचारातील अनेक वचने अंमलात आणण्यासाठी पावले उचलण्याची सुरुवात केली. यात महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे घुसखोरी रोखण्यासाठी उचलण्यात आलेले पाऊल.

सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी लागू केली. आता या ठिकाणी आर्मी आणि नॅशनल गार्ड्सच्या संख्येत कमालीची वाढ होणार आहे. त्यांच्या पहिल्या टर्ममध्येही ट्रम्प यांनी या जागेला घुसखोरीचे ठिकाण मानून याठिकाणी महागडी भिंत बांधण्यास सुरुवात केली होती, परंतु ते काम अपूर्णच राहिले होते. पण, या कामांना आता गती मिळेल असे बोलले जात आहे.

अमेरिकेत बायडन यांच्या प्रशासनाच्या काळात सीमा ओलांडण्याचे प्रमाण वाढले होते. परंतु, सीमाशुल्क आणि सीमा संरक्षणाच्या अलीकडील आकड्यांनुसार गेल्या सहा महिन्यांत या घट झालेली आहे. तसेच कायदेशीर दर्जा नसलेल्यांना निर्वासित करण्यासाठी आणि ताब्यात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छापे मंगळवारपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. सुरक्षेचा धोका मानल्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

२०१९ मध्ये त्यांनी मेक्सिको सीमेवर आणीबाणी जाहीर केली आणि भिंत बांधण्यास सुरुवात केली. या सीमेवरून सर्वाधिक घुसखोरी झाली आणि अमली पदार्थांची तस्करीही वाढू लागली, असा आरोप ट्रम्प यांनी केला. बेकायदेशीरपणे अमेरिकेत येणाऱ्या लोकांसाठी अमेरिका मेक्सिको सीमा हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे, जो तीन हजार किलोमीटरवर पसरलेला आहे. यामध्ये चार अमेरिकन आणि सहा मेक्सिकन राज्यांचा समावेश आहे. वाळवंट, नदी आणि पर्वत यांच्यामध्ये पसरलेली ही सीमा खुली आहे. या भागात कायमस्वरूपी गस्त नाही, भिंत किंवा कुंपणही नाही. यामुळेचं येथून घुसखोरी होते. गेल्या तीन दशकांत ही सीमा अवैध प्रवेशासाठी कुप्रसिद्ध आहे. अलिकडच्या वर्षांत कॅनडा- अमेरिका सीमेचाही घुसखोरीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आशियाई लोकांना या मार्गाने प्रवेश करणे सोपे आहे कारण कॅनडाचा व्हिसा मिळवणे त्यांच्यासाठी सोपे आहे.

हे ही वाचा : 

‘हॅरी पॉटर’ महाकुंभात पोहोचला, भंडाऱ्याचा घेतला आस्वाद?

महाकुंभ : नवव्या दिवशी सकाळी १५ लाख तर काल ५४ लाखांहून अधिक भक्तांनी केले स्नान!

… म्हणून विवेक रामास्वामी यांचा ट्रम्प सरकारमधील DOGE चे काम पाहण्यास नकार!

गड किल्ल्यांवरील अतिक्रमणांवर बुलडोजर फिरणार, फडणवीसांनी दिली तारीख!

हैतीसारख्या लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन देशांतील लोकांनी सागरी मार्गाने अमेरिकेत घुसखोरी सुरू केली आहे. ते जहाजे किंवा लहान बोटीतून रात्रभर लांबचा प्रवास करतात. दरम्यान, सागरी अपघातात अनेकांचा मृत्यू होतो. मात्र, घुसखोरीच्या बाबतीत मेक्सिको सीमेचे नाव वारंवार येत आहे. युनायटेड स्टेट्स बॉर्डर पेट्रोलने एकट्या २०२१ मध्ये सीमा ओलांडणाऱ्या अंदाजे ११ लाख लोकांना पकडले. एजन्सीने कबूल केले की आणखी बरेच लोक आत गेले असावेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा