इस्रायलने इराणविरुद्ध ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केले आहे. या दरम्यान इस्रायलने इराणच्या अनेक प्रमुख तळांवर हल्ला केला. इस्रायलने अणु तळ उद्ध्वस्त केल्याचा दावाही केला आहे. या दरम्यान अनेक शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. इराणने इस्रायली शहरांवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचे सांगितले जात आहे. इराणने आपल्या प्रत्युत्तराच्या कारवाईला ‘ट्रू प्रॉमिस थ्री’ असे नाव दिले आहे. दोन्ही देशांमधील युद्ध तीव्र झाल्यापासून मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. या दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणु करार करण्याचा इशारा दिला आहे.
‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री’ असे नाव देण्यात आलेल्या इराणच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये किमान तीन जण ठार झाले आणि सुमारे ३४ जण जखमी झाले. शुक्रवारी सुरू झालेल्या आणि शनिवारी (१४ जून) सुरू असलेल्या इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’मध्ये किमान ७८ जणांचा मृत्यू झाला आणि ३२० हून अधिक जण जखमी झाले.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणी राजवट सध्या इस्रायली नागरिकांना लक्ष्य करत आहे. जग याबद्दल गप्प राहू शकत नाही. इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण प्रत्युत्तर देत आहे. असे म्हटले जात आहे की इराणने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.
हे ही वाचा :
आले आले पाकिस्तानचे कमाईचे दिवस आले..
सैन्यदलाची चेष्टा कराल तर औषधालाही शिल्लक राहणार नाही !
एअर इंडियाच्या ताफ्यातील सर्व बोईंग ड्रीमलायनर विमानांची होणार सखोल तपासणी
इस्रायली संरक्षण दलांनी शनिवारी सांगितले की, आतापर्यंत इराणने दोन हल्ल्यांमध्ये इस्रायलवर सुमारे १५० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यांमध्ये नऊ क्षेत्रे प्रभावित झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये सुमारे १५ लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी बहुतेकांची प्रकृती चांगली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, इस्रायलमधील नागरी वस्तीच्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्रे डागण्याचे धाडस करून इराणने लाल रेषा ओलांडली आहे.







