28 C
Mumbai
Saturday, April 18, 2026
घरदेश दुनियाशांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल- हमास सहमत; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल- हमास सहमत; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ट्रम्प यांच्या कराराचे स्वागत

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कराराचे स्वागत केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, ही प्रगती पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे. तसेच त्यांनी आशा व्यक्त केली की ओलिसांची सुटका आणि गाझाच्या लोकांना वाढत्या मानवतावादी मदतीमुळे दिलासा मिळून या प्रदेशात कायमस्वरूपी शांततेचा मार्ग मोकळा होईल.

नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्यातील कराराचे आम्ही स्वागत करतो. हे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचे देखील प्रतिबिंब आहे. आम्हाला आशा आहे की ओलिसांची सुटका आणि गाझाच्या लोकांना वाढत्या मानवतावादी मदतीमुळे त्यांना दिलासा मिळेल आणि कायमस्वरूपी शांततेचा मार्ग मोकळा होईल.”

गुरुवारी, इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी भारताच्या पाठिंब्याचे कौतुक केले. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “इस्रायली शिष्टमंडळाच्या आणि आमच्या सर्व ओलिसांना सोडण्यासाठी करार करण्यात सहभागी असलेल्या सर्वांच्या प्रयत्नांबद्दल आभारी आहे. ट्रम्प यांचे विशेष आभार. दहशतवादी धोक्यांपासून मुक्त होऊन आपण लवकरच शांतता पुनर्संचयित होताना पाहूया. भारताच्या सर्व पाठिंब्याचे कौतुक करतो!”

तत्पूर्वी, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल्या प्रस्तावावर आधारित गाझामध्ये युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी झालेल्या कराराच्या घोषणेचे स्वागत केले. त्यांनी या करारात मध्यस्थी करण्यासाठी अमेरिका, कतार, इजिप्त आणि तुर्की यांच्या राजनैतिक प्रयत्नांचे कौतुक केले आणि सर्व संबंधित पक्षांना कराराच्या अटींचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन केले.

हे ही वाचा:

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम; इस्रायल- हमास शांततेसाठी सहमत

कोल्ड्रिफ सिरप बनवणाऱ्या स्रेसन फार्माच्या मालकाला अटक

दिवाळीपूर्वी पोलिसांची नागरिकांना भेटवस्तू

गुंतवणुकीच्या नावाखाली ३.२६ कोटींची फसवणूक

कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते माजेद अल अन्सारी यांनी गुरुवारी सांगितले की, गाझा युद्धबंदी कराराच्या पहिल्या टप्प्यातील सर्व तरतुदी आणि अंमलबजावणी यंत्रणेवर एक करार झाला आहे. अन्सारी म्हणाले की, या करारात इस्रायली ओलिस आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका समाविष्ट होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा