28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरदेश दुनियाइस्रायली संरक्षण धोरण तज्ज्ञ म्हणतात ‘ही’ गोष्ट मोदींकडून शिकण्यासारखी

इस्रायली संरक्षण धोरण तज्ज्ञ म्हणतात ‘ही’ गोष्ट मोदींकडून शिकण्यासारखी

भारताच्या अमेरिकेविरुद्ध टॅरिफ धोरणावर घेतलेल्या भूमिकेचे कौतुक

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने अमेरिकेविरुद्ध टॅरिफ धोरणावर कठोर भूमिका घेतली आहे. या भूमिकेचे कौतुक केले जात असून इस्रायली संरक्षण धोरण तज्ज्ञ झाकी शालोम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायलने भारताकडून ‘राष्ट्रीय सन्माना’ला संपत्ती कशी बनवायची हे शिकले पाहिजे. शालोम यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेविरुद्ध टॅरिफ धोरणावर कठोर भूमिका घेतली आहे. भारताच्या पाकिस्तानसोबतच्या सीमा संघर्षांबद्दल त्यांचा दृष्टिकोन दाखवून देतो की राष्ट्रीय सन्मान ही चैनीची वस्तू नाही तर दूरगामी धोरणात्मक संपत्ती आहे.

रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीमुळे अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात कर लादले आहेत. शिवाय यापूर्वी भारताच्या पाकिस्तानशी झालेल्या सीमा संघर्षानंतर युद्धबंदीच्या वाटाघाटी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला मोदी सरकारने कठोरपणे विरोध केला. यावर बोलताना ते म्हणाले की, “नरेंद्र मोदींचा तीव्र प्रतिसाद हा केवळ आर्थिक आणि लष्करी तणावातच नव्हता, तर तो राष्ट्रीय सन्मानाच्या अपमानाच्या भावनेतून आला होता. त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे चार फोन कॉल नाकारले. या संदर्भात, इस्रायल महत्त्वाचे शिकू शकते,” असे शालोम म्हणाले.

खान युनिस येथील नासेर रुग्णालयावर इस्रायलने बॉम्ब डागले होते. यामध्ये पत्रकारांसह वीस लोक ठार झाले. काही तासांतच, आयडीएफच्या प्रवक्त्याने निरपराध नागरिकांना इजा केल्याबद्दल माफी मागितली होती. चीफ ऑफ स्टाफनी तात्काळ चौकशीची घोषणा केली होती. तर, पंतप्रधानांनी या घटनेचा दुःखद घटना म्हणून उल्लेख करत याची सखोल चौकशी करण्याची घोषणा केली होती. यावर टीका करताना शालोम म्हणाले, “या तीन नेत्यांची तीन वेगवेगळी विधाने केवळ आंतरराष्ट्रीय जनमत शांत करण्याची इच्छा दर्शवत नाहीत, तर त्या घटनेच्या परिणामांबाबतची अस्वस्थता आणि भीतीसुद्धा व्यक्त करतात. या कृतीतून, या नेत्यांनी निष्पाप नागरिकांच्या मृत्यूसाठी काही अंशी जबाबदारी स्वीकारल्याचा संदेश गेला, जो आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने एक धोकादायक पायंडा ठरू शकतो.”

हेही वाचा..

एकेटीयू दीक्षांत समारंभात शुभांशु शुक्ला यांना मानद पदवी

“मूर्तीपूजेवर बंदीचा हवाला देऊन राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान, देश फोडण्याचा प्रकार”

बलुच नागरिकांच्या हत्येनंतर मानवाधिकार संघटना संतापली

भाजपच्या महिला मोर्चाने मोदींबद्दल केलेल्या अभद्र भाषेचा केला निषेध

पुढे शालोम यांनी म्हटले आहे की, “ट्रम्प यांच्या शाब्दिक हल्ल्यांना तोंड देत नरेंद्र मोदींनी माफी मागण्याची घाई केली नाही तर त्यांनी राष्ट्रीय सन्मान राखत प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला. यातून एक स्पष्ट संदेश गेला, की भारत कोणाकडूनही अपमानास्पद वागणूक स्वीकारणार नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा