31 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरदेश दुनियाचेक डॅममुळे झारखंडमधील शेतकऱ्यांना नवसंजीवनी

चेक डॅममुळे झारखंडमधील शेतकऱ्यांना नवसंजीवनी

Google News Follow

Related

भारतासारख्या प्रामुख्याने कृषी आधारित अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना सातत्याने उत्पादनासाठी आवश्यक अशा स्रोतांची नितांत आवश्यकता असते. त्याबरोबरच ते स्रोत नष्ट होणार नाहीत याचीही काळजी घेणे आवश्यक असते. झारखंडच्या खुंटी जिल्ह्यात मागील दशकभरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. त्यामुळे शेतीसाठी छोट्या आणि मध्यम आकाराचे पाण्याचे साठे असूनही, मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी झाली.

सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या पाणी जिरवण्याच्या विविध मोहिमांना अल्प यश होत होतेच, मात्र तरीही लक्षणीय फरक पडला तो एका साध्या सरळ सोप्या उपायानंतर. ‘बोरी बांध’ या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या अतिशय स्वस्त चेक डॅममुळे परिस्थितीत फरक पडू लागला.

सेवा वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेच्या अजय शर्मा यांच्या कल्पनेतून सत्यात उतरलेल्या या डॅमच्या बांधकामांना २०१८ पासून सुरूवात झाली. दोन वर्षांतच या डॅम्सनी ७० गावांतील पाणी प्रश्न सोडवून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. या डॅम्समुळे गावांतील पाणी टंचाई आणि पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवायला गावकऱ्यांना सहाय्य केले.

‘बोरी बांध’ अतिशय सोपी संकल्पना आहे. बांधकाम कंत्राटदार सामान्यतः सिमेंटचा पुरवठा केल्यानंतर त्यांच्या गोण्या तशाच रिकाम्या सोडून जातात. त्यानंतर त्याच गोण्यांत वाळू आणि माती भरून त्यांचा वापर बंधारे बनविण्यासाठी केला जातो. हे बंधारे सामान्यपणे छोटे ओढे, ओहोळ इत्यादी पाणवठ्यांवर बांधले जातात. त्यांची रुंदी सामान्यपणे ३० फूट असते आणि त्यात माती, वाळू भरलेली पोती एकाबाजूला एक अशी रचून ठेवली जातात आणि पाण्याचा प्रवाह अडवला जातो. माती आणि वाळू सोबतच पोती एकमेकांना घट्ट बांधून ठेवण्यासाठी गवताचाही वापर केला जातो. अनेक वर्षांच्या कालावधीतही या बंधाऱ्यांना अगदी कमी प्रमाणात डागडूजी करावी लागते.

शर्मा यांनी गावातील सामाजिक बंधनांचा गावकऱ्यांनीच एकमेकांना मदत करावी यासाठी वापर केला आहे. या गावकऱ्यांमधील मदैत या संकल्पनेचा वापर त्यांनी करून घेतला. या संकल्पनेत गावकरी एखादी चांगली घटना घडल्यानंतर एकत्र जेवण करतात. शर्मा यांनी गावकऱ्यांना एकत्र येऊन बंधाऱ्याचे यशस्वी बांधकाम साजरे करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

हा प्रवास सोपा नव्हता. आम्हाला सुरूवातील वाटले की यासाठी केवळ ₹२००० खर्च येईल. मात्र पुढे खर्च वाढत गेला आणि सगळे पैसे, बांधकामासाठी एकत्र जमलेल्या लोकांसाठी किराणा खरेदी करण्यातच खर्च झाला. ही वाट खडतर होती. शर्मांनी २०१८च्या उन्हाळ्यात काही स्थानिकांना तपकारा तालूक्यात ५ बोरी बांध बांधण्यासाठी पटवलं. त्या पावसाळ्यात पावसाचं पाणी अडवायला या बांधांचा खूप उपयोग झाला आणि त्यामुळे आसपासच्या गावातील स्थानिकांना देखील त्यांच्या पिकांसाठी आणि स्थानिक पाणवठ्यांसाठी बांध बांधण्यासाठी प्रोत्साहित केले.

गावकऱ्यांनी २०१९ मध्ये ११८ बांध बांधले मात्र मागील वर्षीच्या महामारीच्या संकटामुळे गावकऱ्यांनी केवळ ४०च बांध बांधता आले.

या बांधांचा शेतकऱ्यांना फार फायदा झाला आहे. पहिल्या पिकाच्या कापणी नंतर पाण्याच्या उपलब्धतेमुळे त्यांना दुसरे पिक घेता येते. त्यामुळे बेरोजगार बसून राहण्यापेक्षा त्यांना आर्थिक फायदा देखील होऊ लागला आहे. हा फायदा केवळ दुसऱ्या पिकापुरता मर्यादित नसून पिकांच्या वैविध्यातदेखील दिसून येत आहे. पूर्वी जिथे केवळ पारंपारिक पिके उदाहरणार्थ भात, गहू आणि मोहरी एवढीच पिके घेतली जात असत तिथे आता शेतकरी मका, कलिंगड आणि भाज्या यांचे उत्पादन देखील घेत आहेत.

शर्मांच्या या कार्याची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देखील दखल घेतली आहे. या कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देखील मिळाले आहेत. याशिवाय स्थानिक प्रशासनाकडून दुर्मीळपणे मिळणारी शाबासकीची थाप देखील त्यांना त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल मिळाली आहे.

(News18 या संकेतस्थळावरील Innovative Check Dams are Conserving Water, Yielding Greener Results Over 8,000 Jharkhand Farmers या लेखाचा स्वैरानुवाद)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा