31 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरदेश दुनियाएलएसीचं रक्षण करायला 'वज्र' तैनात

एलएसीचं रक्षण करायला ‘वज्र’ तैनात

Google News Follow

Related

भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये के-९ वज्र स्वयंचलित हॉविट्झर्सची एक रेजिमेंट तैनात केली आहे. ही रेजिमेंट चीनसमोर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आहे, जिथे दोन्ही देश गेल्या वर्षीपासून एकमेकांसमोर उभे आहेत. “या तोफा अति उंच भागात भागात देखील काम करू शकतात, या तोफांच्या फील्ड ट्रायल्स अत्यंत यशस्वी होत्या. आम्ही आता यांची संपूर्ण रेजिमेंट एलएसीवर तैनात केली आहे. हे भारतीय सैन्यासाठी उपयुक्त ठरेल.” ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी लडाखमध्ये असलेले लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सांगितले.

के-९ एसची सर्वात लांब मारक क्षमता २८-३८ किमी आहे . ही तोफ ३० सेकंदात ‘बर्स्ट’ मोडमध्ये तीन फैरी, ‘इंटेन्स’ मोडमध्ये तीन मिनिटांत १५ फैरी आणि ‘निरंतर’ मोडमध्ये ६० मिनिटांमध्ये ६ फैरी झाडू शकते. या तोफा १ किमीच्या रेंजसह थेट गोळीबार करण्यासदेखील सक्षम आहे.

१५५ मिमी/५२ -कॅलिबर के-९ एस, हे एलअँडटीने गुजरातमधील हजीरा येथे दक्षिण कोरियन संरक्षण प्रमुख हनवा डिफेन्स कडून तंत्रज्ञान हस्तांतरण करून बांधले होते. २०१७ मध्ये झालेल्या कराराअंतर्गत, एलअँडटीने यापैकी १०० तोफा भारतीय सैन्याला पुरवल्या. २०२१ मध्ये या तोफा लष्कराला सुपूर्द करून, होविट्झर्स नियोजित वेळेपूर्वी वितरित केल्या गेल्या.

हे ही वाचा:

मी स्वतः भारतीय लस घेतली आहे, यूएनजीए अध्यक्षांनी जगाला सांगितले

पंजाबमध्ये कॅप्टन स्वतःची वेगळी ‘इनिंग’ सुरु करणार

शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार

दुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम!

एलअँडटी ने महाराष्ट्रातील पुणे, तळेगाव आणि पवई येथील सुविधांवर अग्नि नियंत्रण प्रणाली, दारुगोळा हाताळणी प्रणाली आणि रडार यासह बंदुकीच्या १३ उपप्रणाली बांधल्या आहेत. पूर्व लडाखमध्ये या तोफांच्या रेजिमेंट (१८ बंदुका एक रेजिमेंट) तैनात केल्याने भारतीय लष्कराच्या मारक क्षमतेला मोठी चालना मिळेल. लष्कराने पीपल्स लिबरेशन आर्मीला (चीन) रोखण्यासाठी मुख्य लढाऊ रांगडे आणि आर्मर्ड वाहनंदेखील लडाखला तैनात केली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा